मराठी विषयाचे मूल्यांकन 'श्रेणी' स्वरूपात ; राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर शाळांसाठी निर्णय          

पुढील तीन वर्षांपर्यंत आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मूल्यांकन करताना अ, ब, क,ड अशा श्रेणी स्वरूपात करावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

मराठी विषयाचे मूल्यांकन 'श्रेणी' स्वरूपात ; राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर शाळांसाठी निर्णय          

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४  पासून पुढील तीन वर्षांपर्यंत आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मूल्यांकन करताना अ, ब, क,ड अशा श्रेणी स्वरूपात करावे, असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळाच्या इतर विषयांच्या एकत्रित मूल्यांकनामध्ये करण्यात येऊ नये असे अध्यादेश काढून स्पष्ट करण्यात आले आहे.                      

राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन शक्तीचे करण्यात आले आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) भारतीय माध्यमिक शिक्षण मंडळ (आयसीएसई) आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (आयबी) तसेच केंब्रिज व अन्य मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या खाजगी/ केंद्रीय अशा सर्व शाळांसाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.          

      मराठी भाषेच्या अध्यापन व अध्ययन शक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी कोरोना काळात सुरू झाले या कालावधीमध्ये शाळा नियमितपणे सुरू ठेवण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. २०२०- २१ पासून सक्तीच्या मराठी भाषा अध्ययन व अध्यापनाची प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाले. परिणामी मराठी विषयाच्या अध्ययनामध्ये व पर्यायाने संपादणूकीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय नवीन असल्याने त्यांच्या बाबतीत ही बाब अधिक प्रकर्षाने आढळून आली. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून इतर परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा मूल्यांकनाबाबत सुलभता येण्यासाठी या विद्यार्थ्यांचे श्रेणी स्वरूपात मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.