सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठीतून पुस्तके; उच्च शिक्षण विभागाच्या विद्यापीठांना सूचना

चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील विभाग, सर्व स्वायत्त महाविद्यालये व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठीतून पुस्तके; उच्च शिक्षण विभागाच्या विद्यापीठांना सूचना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाकडून (Maharashtra Government) आवश्यक असणाऱ्या पायाभूत गोष्टींची तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठांना (Universities in Maharashtra) सर्व विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेतून (Marathi Language) उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य यासह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके मातृभाषेतून उपलब्ध होणार आहेत.

एनईपीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील विभाग, सर्व स्वायत्त महाविद्यालये व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व महाविद्यालयांमध्ये एनईपी लागू होईल. मात्र, सध्या विज्ञान विद्याशाखेसह व्यावसायिक अभ्यासक्रमांची बहुतांश पुस्तके ही केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येतात. परंतु लवकरच हा अडसर दूर होणार आहे.

राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी महाविद्यालये सुरु करता येणार ; माहेडची बैठक संपन्न, बृहत आराखड्यास मान्यता

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद देवळाणकर यांनी नुकतीच सर्व विद्यापीठांतील आयक्यूएसी सेलच्या संचालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीमध्ये देवळाणकर यांनी सर्व अभ्यासक्रमांची पुस्तके मराठी भाषेत भाषांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढील महिनाभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजते. त्यासाठी मुंबई आयआयटीने तयार केलेल्या एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार असल्याचेही समजते. यामध्ये कमीत कमी कालावधीत इंग्रजीचे मराठीमध्ये भाषांतर होते.

दरम्यान, याविषयी माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटरनल क्लाविली अश्युरन्स सेलचे (IQAC) संचालक डॉ. संजय ढोले यांनी सांगितले की, सर्व अभ्यासक्रमांची पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. पुणे विद्यापीठामध्ये याबाबत मागील तीन महिन्यांपासून काम सुरू असून लवकर ते पूर्ण होईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo