JEE मेन्स सत्र 2 परीक्षेला जाताना कोणत्या वस्तू बाळगू नयेत, ड्रेस कोड काय असावा ?

या वस्तू सोबत घेऊ नका आणि हे नियम लक्षात ठेवा

JEE मेन्स सत्र 2 परीक्षेला जाताना कोणत्या वस्तू बाळगू नयेत, ड्रेस कोड काय असावा ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency) दोन दिवसांनी म्हणजे 4 एप्रिलपासून जेईई मुख्य परीक्षा (JEE Main Exam)सत्र आयोजित केली जाणार आहे. येत्या 4 ते 12 एप्रिल दरम्यान जेईई मुख्य परीक्षा होणार आहेत. या परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आल्या असून  ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये  होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी असेल.तसेच परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याबाबतही एनटीए स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

 

या वस्तू सोबत घेऊ नका


* पेन, कागद, भूमिती बॉक्स इत्यादी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत बाळगू नका.

* शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेली ओळखपत्रे वैध नाहीत, ती बाळगू नका.

* कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्यासोबत कधीही नेऊ नका, 

* कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बाटल्या इत्यादी घेऊन जाण्याची परवानगी नाही.

* कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू, दागिने, उपकरणे इत्यादी घेऊन जाऊ नका किंवा पर्स किंवा हँडबॅगसह केंद्रावर जाऊ नका.

हे नियम लक्षात ठेवा


* परीक्षेच्या किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचा. उशीर झाल्यास प्रवेश दिला जाणार नाही.

* तुमच्यासोबत हॉल तिकीट आणि स्व-घोषणापत्र सोबत घ्या.

* रफ शीटवर तुमचे नाव आणि रोल नंबर लिहा. कृपया सभागृहातून बाहेर पडण्यापूर्वी ते निरीक्षकांना द्या.

* परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीट, छायाचित्र, वैध ओळखपत्र तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे.

 * मधुमेही विद्यार्थी पारदर्शक बाटलीत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेऊन जाऊ शकतात.

ड्रेस कोडकडे लक्ष द्या


* डोक्यावर मफलर, टोपी किंवा इतर काहीही घालू नका.

* धातूच्या वस्तू असलेले कपडे घालू नका.

* खूप खिसे असलेले कपडे घालू नका.

* दागिने घालू नका आणि साधे कपडे निवडा. ॲक्सेसरीजही घालू नका.