NEET PG 2024 परीक्षेच्या तारखेत बदल 

यापूर्वी  ही परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाणार होती.

NEET PG 2024 परीक्षेच्या तारखेत बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG परीक्षेस बसलेल्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS)  ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार  NEET PG परीक्षेच्या वेळापत्रकात बदल (Change in schedule)करण्यात आला आहे.

आता NEET PG 2024 परीक्षा ७ जुलै २०२४ रोजी आयोजित केली जाणार आहे.  यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यापूर्वी  ही परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाणार होती.  वैद्यकीय परीक्षेला बसण्यास इच्छुक असणारे उमेदवार  nbe.edu.in, natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशीलवार वेळापत्रक तपासू शकतात.

बातमीत आणखी नवीन मुद्दे अपडेट होत आहेत..