मोठी बातमी : CA इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा 'या' कारणामुळे स्थगीत 

द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडिया  (ICAI) ने, देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे CA इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

मोठी बातमी : CA इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा 'या' कारणामुळे स्थगीत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सीए फाउंडेशन (CA Foundation) आणि इंटरमिजिएट परीक्षा २०२४ (Intermediate Exam 2024) च्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडिया  (ICAI) ने, देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे CA इंटर, फायनल आणि फाउंडेशनच्या परीक्षा पुढे ढकलल्या (Exam date postponed) आहेत. निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती यापूर्वी ICAI  दिली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत. 

परीक्षा पुढे ढकलल्यानंतर ICAI नवीन  तारखा जाहीर करण्याची तारीखही जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेचे नवीन वेळापत्रक 19 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. CA इंटरमिजिएट ग्रुप 1 ची परीक्षा ICAI द्वारे 3, 5 आणि 7 मे 2024 रोजी घेतली जाणार होती आणि गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 मे 2024 रोजी होणार होती. सीए अंतिम गट 1 ची परीक्षा 2, 4 आणि 6 मे 2024 रोजी आणि गट 2 ची परीक्षा 8, 10 आणि 12 मे 2024 रोजी होणार होती.

या सर्वांशिवाय, सीए फाउंडेशन परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जाची प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण झाली. परीक्षा मे/जूनमध्ये होणार होती जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.