'आपले सरकार' पोर्टलवरून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे तब्बल ८ वर्षांनी निवारण ; म्हणे आता कारवाईची आवश्यकता नाही

सामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम केले जाणार असेल तर राज्य शासनाने 'आपले सरकार' हे पोर्टल बंद करावे. 

'आपले सरकार' पोर्टलवरून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे  तब्बल ८ वर्षांनी निवारण ; म्हणे आता कारवाईची आवश्यकता नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

'आपले सरकार' या पोर्टल (Aaple Sarkar Portal) वर आमच्या एका पदाधिकाऱ्याकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी (Department of Higher and Technical Education) संबंधित २०१६ साली एक तक्रार दाखल करण्यात आली होती. तब्बल ८ वर्षानी ही तक्रार मंत्रालयात पाठवण्यात आली असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने  (Competitive Examination Coordination Committee) केला आहे. यापुढे देखील असेच होणार असेल आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जाणार असेल तर राज्य शासनाने 'आपले सरकार' हे पोर्टल बंद करावे, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. 

आपले सरकार https://grievances.maharashtra.gov.in/en या पोर्टलवर महाराष्ट्रातील नागरिक शासकीय विभागासंबंधित तक्रारी करू शकतात. पण आपल्या गतिमान सरकार मध्ये २०१६ ची एक तक्रार, काल म्हणजे एका दिवसापुर्वी तब्बल आठ वर्षानी निवारणासाठी मंत्रालयात पाठविण्यात आली आहे.  यानिमित्ताने जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सोडले जात आहेत. हे समोर आले आहे,अशी टीका समन्वय समितीने केली आहे. 

सोलापूर येथील इंजिनियरिंगचा विद्यार्थी हॉस्टेलला राहत होता. एक सेमिस्टर हॉस्टेलला राहायला होता. मात्र, संबंधित विद्यार्थी केवळ एक सेमिस्टर हॉस्टेलला राहण्यासाठी होता तरीही त्यांच्याकडून दोन सेमिस्टरचे शुल्क आकारण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्र शुल्क भरले नाही म्हणून अडवून ठेवले.याबाबत विद्यार्थ्याने आपले सरकार पोस्टलावर तक्रार केली होती.त्यावर ही तक्रार 2016 ची असून या तक्रारीवर कार्यवाही करण्याची आवश्यकता उरली नाही,असे उत्तर आपले सरकार पोर्टलावरून वरून देण्यात आले आहे.