संधीचं सोनं करा; सर्टिफाईड ट्रेनर्स म्हणून करिअर घडवा...

भारत सरकार आणि विविध शासकीय रचना यासाठी मोठ्या महत्वाकांक्षी योजना आखत आहेत. धोरणे ठरली आहेत. त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

संधीचं सोनं करा; सर्टिफाईड ट्रेनर्स म्हणून करिअर घडवा...
Certified Trainer

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारत (India) हा देश एक मोठी बाजारपेठ आहे. तसेच भारत हे उत्पादन क्षेत्रात जगात आघाडीवर राष्ट्र आहे. सध्या त्या प्रगतीचा वेग योग्य दिशेने आहे आणि वेग सुद्धा उत्तम आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच भारताचे उद्योगवाढीचे (Industrial Growth) धोरण उपयोगाला येत आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या, शिक्षित तरुण तरुणी, उद्योगवाढीसाठीच्या पोषक प्राथमिक पायाभूत सुविधा (Primary Infrastructure) या सगळ्या बाबी त्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या तर या सगळ्या बाबी अत्यंत सकारात्मक पद्धतीने पुढे सरकताना दिसत आहेत. (Opportunity to build a career as a certified trainer)

यामध्ये आता गरज आहे सुशिक्षित मंडळी कुशल होण्याची. शिक्षणाने (Education) एका विशिष्ट मर्यादेपर्यंत धाव घेता येते. त्याला कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाची जोड मिळाली की क्रयशक्तीचा वेग वाढू शकतो. करोडोंच्या संख्येने असणाऱ्या युवाशक्तीला विविध क्षेत्रांसाठी प्रशिक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे, असे पुण्यातील स्वयंरोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शक संजय गांधी (Sanjay Gandhi) यांनी सांगितले. गांधी यांनी याविषयी विस्तृत माहिती देत करिअरच्या विविध पर्यायांचा या लेखात उहापोह केला आहे.

हेही वाचा : ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

भारत सरकार आणि विविध शासकीय रचना यासाठी मोठ्या महत्वाकांक्षी योजना आखत आहेत. धोरणे ठरली आहेत. त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरज आहे यासाठी समाजाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची. प्रशिक्षित मंडळी प्रत्यक्ष काम करतील तर यांना प्रशिक्षण देणारे सर्टिफाईड ट्रेनर्स या कामातूनच त्यांचे करिअर करतील अशी रचना आहे.

विविध सेक्टर्स मध्ये प्रशिक्षित युवक युवती तयार व्हावेत यासाठी ट्रेनर्स ची गरज आहे. तो आकडा महाप्रचंड आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचा मोठा परतावा या ट्रेनर्सना मिळणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये टर्निंग, व्हर्टिकल मशिनिंग सेंटर, फिटर, सी एन सी प्रोग्रामर, वेल्डर अशी असंख्य कामे आहेत जिथे प्रशिक्षित युवक आत्मनिर्भर करिअर करू शकतील. आणि यांना प्रशिक्षण देणाऱ्या ट्रेनर्सना सातत्याने हे काम उपलब्ध होत असल्याने त्यांचा ही उत्पन्नाचा आकडा वाढेल. हार्डवेअर टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन, हाऊसकीपर, कूक, हेल्पडेस्क अटेंडेंट, कस्टमर केअर एक्झ्युकिटिव्ह, मोबाईल रिपेअरिंग तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर पासून अनेक कामांसाठी लाखो माणसे हवी आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक ट्रेनर्स त्याच प्रमाणात हवे आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

 

प्रशिक्षकाचे करिअर - फायदे

१) तुमच्याच कौशल्याच्या क्षेत्रात काम

२) सातत्याने उपलब्ध काम

३) प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचा आर्थिक मोबदला

४) आवडीचे काम आणि समाधान

५) प्रशिक्षण प्रक्रियेतून वैयक्तिक कामात  सुधारणा

६) प्रशिक्षितांकडून सन्मान आणि आदर 

७) प्रशिक्षक असल्याचे शासकीय प्रमाणपत्र मिळेल, जे आयुष्यभर उपयोगी ठरेल.

ट्रेनर्स साठीची कार्यक्षेत्रे -

१) एरोस्पेस

२) शेती

३) कपडे

४) ऑटोमोटिव्ह

५) ब्युटी / वेलनेस

६) कॅपिटल गुड्स

७) बांधकाम

८) इलेक्ट्रॉनिक्स

९) अन्नपदार्थ

१०) फर्निचर

११) दागिने

१२) प्लम्बिंग

१३) आय टी /सॉफ्टवेअर

१४) रंगकाम

१५) स्पोर्ट्स

१६) टेलिकॉम

१७) पर्यटन

 आदी अनेक असंख्य क्षेत्रांमध्ये काम करणारी कुशल मंडळी तर हवीच आहेत. पण त्याच बरोबर त्यांना प्रशिक्षण देणारी ट्रेनर्स ची फौज आपल्याला उभी करायची आहे.

कौशल्याधिष्टित प्रशिक्षकांचे योगदान काय राहील?

१) सर्वसामान्य युवक संबंधित क्षेत्रात पारंगत करता येतील.

२) अशा प्रशिक्षणार्थींना दर्जेदार रोजगार मिळेल.

३) बेरोजगारीचा प्रश्न सुटेल.

४) कामांमध्ये गुणवत्ता वाढेल.

५) देशाच्या आर्थिक विकासात वाढ होईल.

६) परिणामी गरीब, तळागाळातील मंडळी वरच्या आर्थिक स्तरात जातील.

७) एखादे काम गुणवत्तेने कसे करायचे हे प्रशिक्षक शिकवतील.

८) दर्जेदार कामांसाठी देशाची ओळख होईल.

ट्रेनर्स बद्दल शासकीय भूमिका -

१) ट्रेनर्स जास्तीत जास्त संख्येने हवे आहेत. ते ट्रेनर्स सर्टीफाईड असतील.

२) ट्रेनर्स चे प्रशिक्षण सहज उपलब्ध.

३) ट्रेनर्स ना सतत काम मिळेल यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेईल.

४) ट्रेनर्स ना चांगला परतावा मिळेल यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध असून तो खर्च करताना शासन सकारात्मक आहे.