NEET UG 2023 : कशी असेल यावर्षीची परीक्षा; जाणून घ्या ऐका क्लिकवर...

ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून होणार आहे.

NEET UG 2023 : कशी असेल यावर्षीची परीक्षा; जाणून घ्या ऐका क्लिकवर...
NEET UG 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET UG 2023 : डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची समजली जाणारी आणि भारतातील सर्वात आव्हानात्मक वैद्यकीय प्रवेश (Medical Admission) परीक्षा मानली जाणारी NEET ची परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच ७ मे रोजी होणार आहे. या परीक्षेचे स्वरूप कसे असेल, काय असतील नियम याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये (Students) उत्सुकता निर्माण झाली आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही एक अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आहे, जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे भारतातील विविध सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS/BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. दि. ७ मे रोजी होणारी NEET ची परीक्षा दुपारी २ ते संध्याकाळी ५.२० या वेळेत होणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून होणार आहे.

हेही वाचा : ZP Recruitment : आत्महत्या कशाला करायची, जीव वर आलाय का? मंत्रालयातील ऑडिओ क्लिप व्हायरल

ही परीक्षा ऑफलाइन (पेन आणि पेपर-आधारित) होणार आहे. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान या विषयांवरील १८० बहू पर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. हे प्रश्न ११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. याविषयी पुण्यातील आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी ‘एज्युवार्ता’शी बोलताना परीक्षेविषयी माहिती दिली.

मंगेशकर म्हणाले, "NTA ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार, NEET-UG-2023 साठी २१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १२ टक्याने वाढली आहे. NEET 2023 साठी नोंदणीची वाढलेली संख्या हे भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहे. तथापि, हे देशातील महत्त्वाकांक्षी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी अधिक वैद्यकीय महाविद्यालये आणि जागांची आवश्यकता देखील अधोरेखित करते."