निकालाची भीती वाटतेय? ना-पासांना मिळणार यशाचा कानमंत्र

मुले विविध विषयातील उपक्रमात भाग घेतात आणि ८ वी पर्यंत पोहचतात. मग ९ वीत व ११ वीत अनुत्तीर्ण होतात. ज्या पालकांची घरची परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले अनेक मार्गाने पुन्हा शिक्षण प्रवाहात राहतात.

निकालाची भीती वाटतेय? ना-पासांना मिळणार यशाचा कानमंत्र
Fail Examinations Reprasentative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुले फक्त ९ वीतच नापास (Fail) होतात असे नाही. विविध कारणांनी मुले ९ वी. १० वी, ११ वी, १२ वी आणि विविध कोर्सेस, इंजिनिअरोग (Engineering), मेडिकल (Medical) यामधून सुध्दा नापास होतात. नापासाचा ठपका त्यांना निराशेच्या गर्तेत लोटत नेतो. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालकांच्या समुपदेशनाप्रमाणेच (counselling) समाजामध्ये या विद्यार्थ्यांकडे (Students) बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यासाठी मायभूमी स्पंदन फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गुंजाळ (Anil Gunjal) यांनी पुढाकार घेतला आहे.

शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातू आणि भारतात मोठा प्रमाणात झालेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार करता वाडी, वस्ती, पाडा, तांडयापर्यंत ग्रामिण आणि शहरी भागात शिक्षणाची गंगा पोचवण्यात शासन व खाजगी स्वयंसेवी संस्थांचे योगदान अमूल्य असे आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या सध्यातरी नगण्य स्वरुपाची असली तरी, विशेषतः वंचित घटकांच्या मुलांना शाळेत आणणेसाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा : मुलांकडून अवाजवी अपेक्षा कराल तर होईल पश्चाताप!

आजपर्यंतची शैक्षणिक धोरणे, आयोग व शासन खाजगी उपक्रमातू शाळेत दाखल झाली, परंतु अजुनही प्रश्न अनुत्तरित आहे, तो दर्जेदार शिक्षणाचा नविन शैक्षणिक धोरण २०२० येऊ घातले आहे. याचे आपण सर्वजण स्वागत करत आहोतच. शिक्षणात माहिती अधिकाराप्रमाणे २००९ च्या बालकांचा सक्तीच्या मोफत शिक्षण अधिकार अधिनियमा यामुळे आमुलाग्र बदल झाला आहे.

२००९ च्या अधिनियमामुळे मुले शाळेत दाखल झाली टिकली, इयत्ता ८ वी पर्यंत शाळेत आहेत. मग प्रश्न येतो अचानक ही मुले इयत्ता ९ वीत का नापास होतात? यावर विचार करण्याची गरज आहे. देशातील, महाराष्ट्रातील प्रत्येक मूल कोणत्यातरी शिक्षण प्रवाहात राहिलेच पाहिजे असे वाटते. ग्रामीण आणि शहरी भागात विविध मंडळांच्या विविध माध्यमाच्या शाळांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. पाल्यांच्या कुवतीप्रमाणे पालक मुलांना शाळेत नर्सरी/बालवाडी पासूनच प्रवेश घेतात आणि त्याचे शिक्षण सुरु होते. मुले विविध विषयातील उपक्रमात भाग घेतात आणि ८ वी पर्यंत पोहचतात. मग ९ वीत व ११ वीत अनुत्तीर्ण होतात.

हेही वाचा : मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या महत्वाच्या टिप्स!

ज्या पालकांची घरची परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले अनेक मार्गाने पुन्हा शिक्षण प्रवाहात राहतात. परंतू ग्रामीण भागातील /शहरी भागातील वस्तीमधील मुले पुढे शिकतीलच असे नाही. विशेषत: मुलगी नापास इ आली तर तिचे शिक्षण बंद होते. घरची परिस्थिती बेताची असेत तर मुलांची शाळा सुटते आणि तो मुले घराला मदत करतात. मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेले की त्यांचे शिक्षण थांबते. मुलांची गळती थांबवयाची असेल तर ही मुले प्रवाहात राहणे आवश्यक आहे. मुले फक्त ९ वीतच नापास होतात असे नाही. विविध कारणांनी मुले ९ वी. १० वी, ११ वी, १२ वी आणि विविध कोर्सेस, इंजिनिअरोग, मेडिकल यामधून सुध्दा नापास होतात. याचा अर्थ ती मुले अभ्यासात कमी असतात असे नाही.

मायभूमी स्पंदन फाउंडेशनमार्फत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात राहणेसाठी मदत केली जाणार आहे. इयत्ता ११ वी १२ वी किंवा इतर कोर्सेस मध्ये मुले अनुत्तीर्ण होण्याची कारणे पुढीलप्रमाणे - शाखेची निवड आवडीप्रमाणे न करणे, आवश्यक तेवढा अभ्यास न करणे इ. तरीही याही मुलांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व आवडीप्रमाणे पुढील शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यापुढे संस्थेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना (KG TO PG) मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती गुंजाळ यांनी दिली.