सुट्टीच्या दिवशीही विद्यापीठाचे कामकाज राहणार सुरू ; काय आहे कारण

अधिसभेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाने सुट्टीच्या दिवशी तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी सुध्दा विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुट्टीच्या दिवशीही विद्यापीठाचे कामकाज राहणार सुरू ; काय आहे कारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University)कामकाज येत्या शनिवारी (दि.16 ) व रविवारी सुट्टीच्या दिवशीही (Saturday and Sunday are holidays)सुरू राहणार आहे. त्यामुळे संलग्न महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना या दिवशी विद्यापीठात जाऊन आपली कामे करता येऊ शकतात.येत्या 23 मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक (cnet meeting)आयोजित करण्यात आली आहे.अधिसभेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाने सुट्टीच्या दिवशी तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी सुध्दा विद्यापीठाचे कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू (University office work continues regularly)ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 23 मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात 2024-25 या वर्षांचे बजेट मंजूरीसाठी सादर केले जाणार आहे.अधिसभेत बजेटसाठी आवश्यक असणारी माहिती , आकडेवारी तसेच अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करावी लागणार आहे.त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही विद्यापीठाचे कामकाज नियमित वेळेप्रमाणे सुरू ठेवण्याबबातचे पत्रक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा : शिक्षण कुलसचिव पदी कोणाची लागणार वर्णी; कोणत्या उमेदवारांनी केले अर्ज

 विद्यापीठातीळ सर्व विभाग प्रमुख , सर्व प्रशाला संचालक , सर्व प्रशासकीय विभागाचे शाखाप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी,अशा सूचना कुलसचिव खरे यांनी दिल्या आहेत.तसेच या दिवसांची पर्यायी सुट्टी यथावकाश जाहीर करण्यात येईल,असे स्पष्ट केले आहे. 
------------------------------------