CBSE कडून परीक्षा केंद्र अधीक्षकांना OECMS पोर्टल अपडेट करण्याचे निर्देश

अनेक परीक्षा केंद्रांद्वारे OECMS पोर्टलमध्ये परीक्षेचा डेटा अद्याप अपडेट केलेला नाही. डेटा अद्ययावत न केल्यास, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची तयारी करताना बोर्डाला अडचणी येऊ शकतात.

CBSE कडून परीक्षा केंद्र अधीक्षकांना OECMS पोर्टल अपडेट करण्याचे निर्देश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परीक्षा सुरु होऊन बराच कालावधी होऊन सुद्धा काही शाळांकडून OECMS पोर्टल अपडेट (OECMS Portal Update) केले जात नसल्याचे बोर्डाच्या लक्षात आल्यानंतर बोर्डाने पुन्हा मुख्याध्यापक आणि परीक्षा केंद्र अधीक्षकांना (Examination Center Superintendent) या संदर्भात कडक निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर बोर्डाने परीक्षेला बसलेल्या आणि परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांचा अहवालही (Student report) मागवला आहे. 

बोर्डाने सांगितले की, सूचना प्रसिद्ध केली असूनही, अनेक परीक्षा केंद्रांद्वारे OECMS पोर्टलमध्ये परीक्षेचा डेटा अद्याप अपडेट केलेला नाही. डेटा अद्ययावत न केल्यास, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची तयारी करताना बोर्डाला अडचणी येऊ शकतात. 15 फेब्रुवारीपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. OECMS पोर्टलवर अनेक परीक्षा केंद्रांनी दिलेली माहिती अद्याप बाकी आहे. सर्व केंद्र अधीक्षकांना OECMS पोर्टलवर माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे.

विविध स्तरावरील लाखो अधिकारी बोर्डाच्या वार्षिक परीक्षेचे काम पाहात असतात. परीक्षांचे उत्तम व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी दैनंदिन परीक्षांशी संबंधित नोंदींची योग्य देखभाल आणि ऑनलाइन अद्ययावतीकरण खूप महत्त्वाचे आहे. पोर्टलवर डाटा अपडेट न केल्याने  मोठ्या प्रमाणात अडचणीत  वाढ होत आहे, असेही बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.