मोठी बातमी : आरटीईची लॉटरी काढली, पालकांनो तयार रहा!

एक लाख १९६९ जागांसाठी तीन लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

मोठी बातमी : आरटीईची लॉटरी काढली, पालकांनो तयार रहा!
RTE Admission News Update

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

शिक्षण विभागाकडून बुधवारी आरटीई प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली. ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी एनआयसीकडे लॉटरीद्वारे काढण्यात आलेले क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना १२  एप्रिल रोजी प्रवेशाचे संदेश नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणार आहेत, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले. (Education department conducts RTE lottery for admission in schools)                                

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी गोसावी यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, एनआयसीचे उपमहासंचालक अशोक कौल, एससीईआरटीचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, योजना विभागाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते. (RTE Admission News Update) 

        

राज्यातील ८ हजार ८२८  शाळांमधील १  लाख १ हजार ९६९  जागांसाठी ३  लाख ६६  हजार ५६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील तब्बल २ हजार १७२ अर्ज दुबार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी ३ लाख ६४ हजार ३९० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी उरले. या विद्यार्थ्यांची बुधवारी लॉटरी काढण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या गोगटे शाळेतील विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चिठ्ठ्या उचलल्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात झाली. (RTE Update)


 प्रवेशाचे एसएमएस मिळण्याचा दिनांक : १२  एप्रिल २०२३

कागदपत्र पडताळणी करण्याचा कालावधी : १३ ते २५ एप्रिल              

शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश केव्हा घेता येणार : २५ ते ३० एप्रिल