'एसपीएम'च्या चिमुकल्यांनी लुटला पदवीप्रदानचा आनंद

देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून यावर्षी पदवीदान समारंभ पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेला. पुणेरी पगडी, उपरणं, सलवार - कुर्ता अशा पारंपारिक पोशाखामध्ये विद्यार्थी उठून दिसत होते.

'एसपीएम'च्या चिमुकल्यांनी लुटला पदवीप्रदानचा आनंद
SPM English School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एखाद्या विद्यापीठाची (University) पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण शाळेतच असा अनुभव घेण्याची संधी शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळत आहे. एस .पी .एम  इंग्लिश स्कूलच्या (SPM English School) पूर्व प्राथमिक विभागातून प्राथमिक विभागात जाणाऱ्या मुलांच्या पदवीदान समारंभाचे (Graduation Ceremony) स.प महाविद्यालयाच्या (SP College) लेडी रमाबाई हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/ 

समारंभाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलनाचा कार्यक्रम संस्थेचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोहनलाल जैन, शाळा समितीचे अध्यक्ष मिहिर प्रभुदेसाई व  शाळा समितीचे सदस्य सुधीर काळकर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुलांनी मराठी, हिंदी व संस्कृत भाषेतून समूहगान गायले. यामध्ये या विश्वाची आम्ही लेकरे, इतनी शक्ती हमे देना दाता आणि प्रकृत्या सुरम्यम ही गीते सादर केली.

देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून यावर्षी पदवीदान समारंभ पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेला. पुणेरी पगडी, उपरणं, सलवार-कुर्ता अशा पारंपारिक पोशाखामध्ये विद्यार्थी उठून दिसत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्व- प्राथमिक विभागाच्या समन्वयक अनिता लागू यांच्या सहकार्याने शिक्षक, शिक्षकेतरांनी हा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला .

हेही वाचा : 'आधार'वरील संच मान्यतेला न्यायालयात देणार आव्हान

शाळेतील तीन वर्षांच्या आठवणींच्या फोटोंचा खजिना पोर्टफोलिओ आणि प्रशस्त्रीपत्रक  विद्यार्थांना देण्यात आले. या कार्यक्रमाला पालकांनी सुद्धा पारंपारीक पेहराव परीधान केला होता. सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांचे स्वागत सनई-चौघड्यांच्या वादनाने करण्यात आले.