जिल्हा परिषद भरतीची प्रतीक्षा संपली  ; अभ्यासक्रम झाला प्रसिध्द

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट -क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सुधारित सूचना प्रसिद्ध केली आहे.त्यात संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद भरतीची प्रतीक्षा संपली  ; अभ्यासक्रम झाला प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेतील jilha parishad रिक्त पदांच्या भरती ZP recruitment संदर्भात कोणत्याही हालचाली होत नसल्याने स्पर्धा परीक्षांचा competitive exam अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून student  प्रचंड असंतोष व्यक्त केला जात होता. परंतु, या परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. ग्रामविकास विभागाने gramvikas vibhag जिल्हा परिषदेतील गट -क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सुधारित सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात संभाव्य लेखी परीक्षेचे written exam स्वरूप जाहीर करण्यात आले आहे.                                
       जिल्हा परिषदेच्या भरती संदर्भात संभाव्य परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सहा राज्यस्तरीय समित्या स्थापन केल्या होत्या.या समितीने सुचवल्याप्रमाणे अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील १८ हजार ९३९ रिक्त जागांसाठी शासनाकडून भरती राबवली जाणार आहे.या भरतीसाठी प्रत्येकी २ गुणांचे १०० प्रश्न विचारले जाणार आहेत.त्यासाठी २ तासांचा कालावधी दिला जाणार आहे.त्यात मराठी , इंग्रजी, सामान्यज्ञान गणित व बुद्धिमापन या विषयावर प्रत्येकी १५ प्रश्न तर ४० तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत.तसेच या परीक्षेसाठी दहावी, बारावी पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढल्या जाणार असल्याचे स्पष्ट  केले आहे.    
    राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे.त्यात सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील संवर्गाच्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या काठिण्य पातळीनुसार इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान,  बुद्धिमापन व गणित या विषयावरील प्रकार अ व ब करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी लागू आहे ते संवर्ग प्रकार-क मध्ये नमूद केले आहेत,असे अध्यादेशांत स्पष्ट करण्यात आले आहे.