बोसग इंन्स्पेक्टर प्रमाणपत्राबाबत आरोग्य सेवा संचालनालयाने संस्थाचालकांकडून मागितला तपशिल 

सर्व तपशील तीन दिवसांच्या आत प्रत्यक्ष हजर राहून सादर करावा, अन्यथा आपल्या संस्थेच्या उमेदवारांकडून सादर केलेले प्रमाणपत्र अवैध ठरवून उमेदवाराला अपात्र घोषित करण्यात येईल, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

बोसग इंन्स्पेक्टर प्रमाणपत्राबाबत आरोग्य सेवा संचालनालयाने संस्थाचालकांकडून मागितला तपशिल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (Health Supervisors, Health Inspectors and Multipurpose Health Workers) या पदासाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी इंन्स्पेक्टर प्रमाणपत्र (Sanitary Inspector Certificate) वाटपात फसवेगिरी होत असल्याची काही उमेदवारांनी तक्रार केली. उमेदवारांच्या या तक्रारीनंतर महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालयाने (Directorate of Health Services) शासन मान्य संस्थांकडून प्रमाणपत्राबाबत तपशील मागवला आहे. दिलेला सर्व तपशील तीन दिवसांच्या आत प्रत्यक्ष हजर राहून सादर करावा, अन्यथा आपल्या संस्थेच्या उमेदवारांकडून सादर केलेले प्रमाणपत्र अवैध ठरवून उमेदवाराला अपात्र घोषित करण्यात येईल, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 

मागील वर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑनलाईन परीक्षा आयोजित केली. त्यानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्याच्या अनुषंगाने समुपदेशानासाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांकडून आवश्यक असलेले सॅनिटरी इंन्स्पेक्टर प्रमाणपत्र विविध संस्थांकडून प्राप्त करुन कागदपत्रे पडताळणी वेळी सादर केले आहे. अशा सर्व संस्थांना तीन दिवसाच्या आत खालील माहिती देणे बंधनकारक असणार आहे. 

संस्थाचालकाने चालवित असलेल्या संस्थेला भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय किंवा भारत सरकारच्या स्वास्थ मंत्रालय यांचा सदरचा अभ्यासक्रम चालविण्यास देण्यात आलेला पुरावा सादर करावा. संस्थेच्या परीक्षा या कोणामार्फत घेतल्या जातात. परीक्षेचे पेपर कोणाकडून काढले जातात व पेपर कोणत्या यंत्रणेकडून तपासले जातात. अभ्यासक्रमाचे ऑकेडमिक वर्ष कधी चालू होते व कधी संपते. परीक्षा या सेमिस्टर पध्दतीने होतात का अॅन्युअल पॅटर्न पध्दतीने होतात. संस्थेचे निरीक्षण कोणत्या शासकीय यंत्रणेमार्फत होते. संस्थेमध्ये सदर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी कोणता प्रशिक्षित वर्ग किती आहेत. त्यांनी घेतलेल्या तासिका व लेक्चर घेतेवेळी काढण्यात आलेले टाचण वही सादर कराव्यात. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कोठे होते व काय शिकवले जाते याची माहिती सादर करावी. संस्थेत नियमित मुले असतात का असतील तर त्यांची हजेरीपत्रक सादर करावे. शासकीय नियमाप्रमाणे ७५टक्के हजेरी भरल्याशिवाय परीक्षा देता येत नाही,असे असेल तर आपणाकडे प्रवेश हे नियमित होतात की एक्सटर्नल होतात. आपली संस्थाही धर्मादाय आयुक्तालय मध्ये नोंदणी आहे काय, असेल तर त्यांची बायलॉज मध्ये काय उद्दिष्ट्ये आहेत त्याची माहिती सादर करावी असे सांगण्यात आहे.