पोलीस भरती २०२४ : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या, समन्वय समितीची सरकारकडे मागणी 

गरजवंतांना न्याय देण्यासाठी कमीत कमी दोन दिवस तरी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ  देण्यात यावी,

पोलीस भरती २०२४ : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या, समन्वय समितीची सरकारकडे मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी  १७ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती (Police Recruitment) काढली. यासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नुकतेच दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून एसीबीसी प्रमाणपत्र (ACBC Certificate) मागवण्यात आले होते. आरक्षण दिल्यानंतरची ही पहिलीच भरती असल्याने अनेक उमेदवारांची तारांबळ उडाली तर काही तरुणांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे एसीबीसी प्रमाणपत्र न मिळाल्याने अर्ज भरता आले नाहीत.  त्यामुळे गरजू मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी कमीत कमी दोन दिवस तरी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ  (Application deadline extension) देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) सरकारकडे केली आहे.

शासनाने मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिले आहे. एसीबीसीचे प्रमाणपत्र मराठा समाजाला लवकर प्राप्त झालेले नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी खूप अडचणी आलेल्या आहेत. पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख संपत आली असताना सुद्धा काहींना एसीबीसीचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. आता पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे. बऱ्याच मुलांना फॉर्म भरता आला नाही. 

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आम्हाला संपर्क करण्यात आलेला आहे, बरीच मुलं प्रत्येक जिल्ह्यात फॉर्म भराण्यापासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे सरकारला विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत.  त्यामुळे तरुणांचे हित लक्षात घेवून कमीत कमी दोन दिवस तरी वाढवून द्यावेत, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्टद्वारे शेअर केले आहे.