LLB 3 year : तीन वर्ष लॉ सीईटीचे स्कोअर कार्ड प्रसिध्द

 विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड त्यांच्या लॉगिन मधून डाऊनलोड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LLB 3 year : तीन वर्ष लॉ सीईटीचे स्कोअर कार्ड प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell) (सीईटी सेल -CET cell) एलएलबी तीन वर्ष (LLB three years) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर (Pre-Entrance Exam Result Declared)झाला असून  विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड (Score card)त्यांच्या लॉगिन मधून डाऊनलोड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे परिपत्रक सीईटी सेल तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलच्या माध्यमातून 12 व 13 मार्च रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असूल विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी या स्कोर कार्डच्या आधारे प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये स्कोर कार्ड  दिसणार आहे.