शिक्षिकेचा अक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शिक्षिका सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत होती . त्यावेळी शाळेच्या आवारातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेतील एका शिक्षकाने ही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना दिली.

शिक्षिकेचा अक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या प्रत्येक जण सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने व्यक्त होत असून त्यात शाळेतील शिक्षकही मागे नाहीत. परंतु, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका शिक्षिकेने शाळेतच अक्षेपार्ह रिल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेचा रील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ही शिक्षिका शाळेत मुलांना शिकवायला येते की रील बनवायला ?   अशी टीका तिच्यावर केली जात आहे.

हेही वाचा : शाळा दत्तक घेण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळात शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेशातील प्रभा नेगी या शिक्षकेने शाळेतच आक्षेपार्ह नृत्य करत रील तयार केला आहे . या रील्स सह तिचे आणखी काही कॉमेडी व्हिडिओ समोर आले आहेत.  काही शिक्षकांनी या शिक्षिकेची लेखी तक्रार केली होती . या तक्रारीच्या आधारे शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित शिक्षकेवर कारवाई  केली . तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. या शिक्षिकेच्या अनेक रीलपैकी काही रील्स शाळेत तयार केल्याचे आढळून आले.

व्हायरल लिंक : https://twitter.com/anubhav57502441

संबंधित शिक्षिका शिकारपूर गावातील रेवाडा उच्च प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ही शिक्षिका सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत होती . त्यावेळी शाळेच्या आवारातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेतील एका शिक्षकाने ही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर शिक्षिकेवर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिक्षक जर वर्गात व्हिडिओ तयार करण्याचे काम करत असेल तर विद्यार्थ्यांना केव्हा शिकवत असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.