ICSE इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज ?

ICSE इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल. 

ICSE इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेतर्फे  (CISCE) शनिवारी (दि.१३ ) ICSE इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल,परंतु, याबाबत अद्याप अधिकृत करण्यात आली नाही. 
      विद्यार्थ्यांना त्यांचे ISCE result 2023 पाहण्यासाठी त्यांचा इंडेक्स क्रमांक आणि दिलेल्या कॅप्चा कोड  UID भरावा लागेल. विद्यार्थी त्यांचे मार्कशीट्स लवकरच  results.cisce.org (https://results.cisce.org/) या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतील. ICSE च्या परीक्षा २७  फेब्रुवारी ते २९  मार्च २०२३ दरम्यान घेतल्या होत्या.परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी निकालाची वाट पाहता होते. 
सीबीएसई बोर्डाचा दहावी- बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यांमुळे आपला निकाल केव्हा प्रसिद्ध होतो. याबाबत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती.अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.पुढील काही मिनिटांत विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.