वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून सुरू झाली बालवाडी

चारुशीला पंकज पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे कर्ज मिळाले.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून सुरू झाली बालवाडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्वत:च आवडीचं करिअर किंवा व्यवसाय सूरू करायच म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भांडवलाचा. याच समस्येमुळे चारुशीला पाटील (Charushila Patil) यांना पुढे जाता येत नव्हते.मात्र ,त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Economic Backward Development Corporation) योजनेबाबतची माहिती घेऊन पुणेयातील जिल्हा कार्यालयाला भेट दिली.तेथे त्यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेविषयी  मार्गदर्शन मिळाले.पुढे दहा लाखांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर आता यांची बालवाडी सुरू झाली. 

हेही वाचा : शाळा दत्तक घेण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळात शिक्कामोर्तब

चारूशीला पाटील यांचे लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभ रहाण्याचे स्वप्न होते.त्यांनी सर्वसामान्यपणे आखलेल्या चौकटीच्या बंधनात न राहता एम.एस्सी, बायो टेक्नोलॉजीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुणे विद्यापीठात मायक्रो बायोलॉजी विभागात समन्वयक आणि प्रकल्प सहाय्य म्हणून नोकरी मिळाली. नोकरी चांगली होती. वेतनही व्यवस्थित होते. तरीही त्यांना स्वतःचे क्षेत्र निवडून त्यात यशस्वी व्हायचे होते. 

चारुशीला पंकज पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे कर्ज मिळाले असून त्यांनी कर्जाच्या रकमेतून त्यांनी़ शालोपयोगी साहित्य खरेदी केले. पुण्यातील साळुंखे विहार येथे त्यांनी कांगारू आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यम बालवाडी (प्री-स्कूल) सुरू केली. या शाळेत साधारण १४ कर्मचारी कामाला असून त्यांनाही यानिमित्ताने रोजगार मिळाला आहे.त्यामुळे पाटील यांची इच्छा तर पूर्ण झालीच पण इतरांना देखील रोजगार मिळाला आहे. 

------------

" शासनाच्या या योजनेचा प्रचार प्रसार झाला तर अनेकांना स्वत:ची स्वप्न पूर्ण करता येतील. तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. सध्या आमच्या शाळेत ४५  विद्यार्थी शिक्षण घेत असून १४  लोकांना नोकरी मिळाली आहे "

 - चारूशीला पाटील