‘आयआयटी’चा डंका आता परदेशातही; भारताबाहेर सुरू होणार पहिला कॅम्पस

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि झांझिबारचे अध्यक्ष हुसेन अली मविनी यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर स्वाक्षरीही  करण्यात आली आहे.

‘आयआयटी’चा डंका आता परदेशातही; भारताबाहेर सुरू होणार पहिला कॅम्पस
IIT Madras

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 मागील काही दिवसांपासून देशातील IIT संस्था जागतिक क्रमवारीत रँकिंगसंदर्भात, नवनवीन अभ्यासक्रम, प्रयोग सुरु करण्यासाठी चर्चेत आहेत. यात आता आणखी भर पडली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताबाहेर पहिला IIT कॅम्पस सुरु होणार आहे. देशातील IIT मद्रास (IIT Madras) चे कॅम्पस टांझानिया या देशातील  झांझिबार या ठिकाणी सुरु केले जाणार आहे. (IIT Madras campus to open in Tanzania, first outside India)

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि झांझिबारचे अध्यक्ष हुसेन अली मविनी यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर स्वाक्षरीही  करण्यात आली आहे. सध्या  जयशंकर हे टांझानियाच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी हा करार झाला आहे.

निकाल वेळेत लावा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यापीठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी

याविषयी अधिक माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, "भारताबाहेर स्थापन होणारा पहिला IIT कॅम्पस झांझिबारमध्ये सुरु होणार आहे. भारताचे शिक्षण मंत्रालय, IIT मद्रास आणि झांझिबारचे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण मंत्रालय यांच्यात यावर  सामंजस्य करार करण्यात आला आहे."

"हे   कॅम्पस भारत आणि टांझानिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीचे द्योतक असणार आहे. तसेच या माध्यमातून भारत आता  संपूर्ण आफ्रिका आणि ग्लोबल साउथमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देणार आहे," असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD