Mumbai University : ‘आयडॉल’ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची संधी, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ 

यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र, एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.

Mumbai University : ‘आयडॉल’ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची संधी, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ 
Mumbai University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूरस्थ व मुक्त अध्ययन संस्था (IDOL) च्या  पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची (Degree Admission) मुदत वाढवून दि. १४ ऑगस्ट करण्यात आली आहे. काही अभ्यासक्रमांसाठी मात्र विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.  आधी ही मुदत दि.  ३१ जुलै रोजी संपणार होती.

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात १२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र, एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. विद्यापीठात सध्या या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत. 

Vertical University : महाराष्ट्र सरकारकडून निकष जाहीर; जागा, इमारत, सोयीसुविधा, पात्रतेच्या अटी पाहा...

पदवीस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट करण्यात आली आहे.

यापैकी प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी १५० रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार आहेत.   हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. सध्या विद्यापीठाच्या आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला

अभ्यासक्रम निहाय प्रथम वर्षात आतापर्यंत झालेले प्रवेश  

१. प्रथम वर्ष बीए : २ हजार ७७१ विद्यार्थी

२. प्रथम वर्ष बी. कॉम : ३ हजार ६४४ विद्यार्थी

३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स : २३२ विद्यार्थी

४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व कॉम्प्युटर सायन्स : ३७० विद्यार्थी

५. प्रथम वर्ष एमए : १ हजार ६०२ विद्यार्थी

६. प्रथम वर्ष एमकॉम : हजार २४६० विद्यार्थी

७. प्रथम वर्ष एमएस्सी : ४१२ विद्यार्थी

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD