11th Admission : विशेष फेरीनंतरही पुण्यात ५० हजार जागा रिक्त, आजपासून दुसरी फेरी

पुण्यात पहिल्या विशेष फेरीमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे.

11th Admission : विशेष फेरीनंतरही पुण्यात ५० हजार जागा रिक्त, आजपासून दुसरी फेरी
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाकडून (Education Department) राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड (PCMC), नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. याअंतर्गत तीन नियमित फेऱ्यांसह एक विशेष फेरीही (11th Admission Special Round) पूर्ण झाली आहे. पण त्यानंतरही पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ५० हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुण्यात पहिल्या विशेष फेरीमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. नियमित फेऱ्यांच्या तुलनेत निवड झालेले विद्यार्थी व प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या विशेष फेरीत उल्लेखनीय आहे. पहिल्या फेरीत प्रवेशासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण अतिवृष्टीमुळे ही मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.

Teachers Award : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण प्रवेश क्षमता १ लाख १६ हजार १५० एवढी असून पहिल्या विशेष फेरीअखेर एकूण ६६ हजार ११८ प्रवेश झाले असून अजूनही ५० हजार ३२ जागा रिक्त आहेत. त्यापैकी सुमारे ४० हजार ५०० जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील (कोटा प्रवेश वगळून) आहेत.

आजपासून दुसरी विशेष फेरी

शिक्षण विभागाकडून मंगळवारपासून (दि. १ ऑगस्ट) दुसरी विशेष फेरी सुरू करण्यात आली आहे. दि. २ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जामध्ये दुरुस्ती आणि पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. तर दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता या फेरीची निवड यादी प्रसिध्द केली जाईल. दि. ४ व ५ ऑगस्ट रोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता येतील.  

 

पुण्यातील अकरावी प्रवेशाची स्थिती

पुण्यात एकूण प्रवेश क्षमता – १ लाख १६ हजार १५०

एकूण प्रवेश – ६६ हजार ११८

पहिल्या विशेष फेरीनंतर रिक्त – ५० हजार ०३२

 

फेरीनिहाय झालेले प्रवेश

फेरी

निवड झालेले विद्यार्थी

प्रत्यक्ष प्रवेश

पहिली 

४२,२३२

२३,०९३

दुसरी

२०,६०२

९,१४४

तिसरी

१४,७०८

५,३१२

विशेष फेरी १

२५,९७३

२१,३०१

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD