तलाठी पदी लोकसभेनंतर नियुक्त्या ? उद्या न्यायालयात सुनावणी, काय होणार 

येत्या मंगळवारी (दि.5 )त्यावर सुनावणी होणार आहे.परिणामी तलाठी पदावरील नियुक्त्या लांबणार,असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

तलाठी पदी लोकसभेनंतर नियुक्त्या ? उद्या न्यायालयात सुनावणी, काय होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पेपर फूटीच्या घटनामुळे तलाठी भरती (Talathi Bharti)वादात सापडेली असल्याचे बोलले जात होते.मात्र,राज्य शासनाने निकाल जाहीर करून उमेदवारांची निवड यादी जाहीर केली.तसेच सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली.मात्र,अद्याप उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. (Candidates not given appointments)त्यातच आता पुढील काही दिवसात लोकसभेची आचारसंहिता (Code of Conduct of Lok Sabha)जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या द्याव्यात,अशी मागणी तलाठी भरतीत निवड झालेल्या उमेदवारांकडून केली जात आहे.परंतु,तलाठी भरतीत गोंधळ झाल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee)न्यायायलात याचिका (Petition to judge)दाखल केली आहे.येत्या मंगळवारी (दि.5 )त्यावर सुनावणी होणार आहे.परिणामी तलाठी पदावरील नियुक्त्या लांबणार,असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

बहूचर्चित तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला, असा आरोप करत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने न्यायालयात याचिका दाखल केली.तत्पूर्वी पेपर पुटीचे अनेक पुरावे शासनाकडे सादर करण्यात आले.तसेच पोलिसांनी सुध्दा याबाबत गुन्हे दाखल केले आहेत.त्यामुळे भरती रद्द करून पुन्हा भरती घ्यावी,अशी मागणी समन्वय समितीकडून केली जात आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी असून शासनाला त्यावर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.त्यामुळे शासन यावर काय बाजू मांडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

हेही वाचा : अखेर मुहुर्त ठरला! महाराष्ट्र पोलिसांच्या कॉन्स्टेबल पदांसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु

राज्य शासनाने पेसा क्षेत्र वगळून तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.पेसा भागात येणाऱ्या उमेदवारांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही.मात्र,उर्वरित भरती प्रक्रिया सुरू केली असून केवळ नियुक्ती देण्याची प्रक्रिया बाकी आहे.तरीही नियुक्ती का दिली जात नाही,याबाबत उमेदवारांमध्ये गोंधळ आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यास नियुक्त्या लांबणार आहेत.त्यामुळे अनेक उमेदवार याबाबत शासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. 
----------------------------

तलाठी भरतीचा निकाल लागून दिडमहिना झाला आहे. Documents verification नंतर 15 दिवसात नियुक्ती मिळण्याची अपेक्षा असते परंतु आता जवळपास महिना उलटूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पेसा क्षेत्रातील निकालही अजून लागला नाही. याबाबत आम्ही सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महसूल विभागाला ही निवेदन दिले आहेत. तलाठी भरतीतील अनेक उमेदवार इतर परीक्षेतही निवड झाले आहेत ते सुरक्षिततेसाठी तिथेही जागा अडवत आहेत. समोर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी सर्वांना नियुक्त्या मिळाव्यात. तरच सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले जाऊ शकेल.

- तलाठी भरतीमध्ये निवड झालेले उमेदवार