UPSC अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षेची तारीख जाहीर 

उमेदवारांना पोर्टलवरूनच ते डाउनलोड करावे लागेल.अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत उमेदवारांनी प्रवेशपत्र सुरक्षित ठेवावे.

UPSC अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षेची तारीख जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission) ईएसई परीक्षेची(ESE EXAM) तारीख जाहीर केली असून येत्या 18 फेब्रुवारी रोजी देशातील विविध केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2 ते 5 पर्यंत चालेल.

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या upsconline.nic.in या वेबसाईटवरील सर्व माहिती तपासून घ्यावी ESE परीक्षा 2024 साठी ई-प्रवेशपत्र (हॉल तिकिट) याच वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. उमेदवारांना पोर्टलवरूनच ते डाउनलोड करावे लागेल.अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत उमेदवारांनी प्रवेशपत्र सुरक्षित ठेवावे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

 उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी त्यांच्या ई-प्रवेशपत्राची प्रिंट आऊट दिलेल्या केंद्रावर द्यावी लागेल. तर जे उमेदवार असे करण्यात यशस्वी होणार नाहीत. त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. प्रवेशपत्रामध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, उमेदवारांनी तत्काळ useng-upsc@nic.in या ईमेलद्वारे आयोगाला कळवावे. उमेदवारांना प्रत्येक सत्रासाठी हॉल तिकिटासह वैध फोटो ओळखपत्र आणावे लागेल, असेही आयोगाने सांगितले आहे.

--------------------------