JEE Advanced 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर  

विद्यार्थ्यांना येत्या २१ एप्रिल पासून ३० एप्रिलपर्यंत ओनालाईज अर्ज भरता येणार आहेत. अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा २६ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या 15 जून रोजी  जाहीर केला जाणार आहे.

JEE Advanced 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशभरातील आयआयटी इन्स्टिट्यूट  (IIT Institute) मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या जेईई अडव्हान्स 2024 (JEE Advanced 2024) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (exam schedule announced) झाले आहे.  विद्यार्थ्यांना येत्या 21 एप्रिल पासून 30 एप्रिलपर्यंत ओनालाईज अर्ज भरता येणार आहेत.देशभरातील सुमारे 711 शहरातील परीक्षा केंद्रांवर अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा २६ मे रोजी (exam date 26th) घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या 15 जून रोजी  जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा : विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये उभारा सेल्फी पॉईंट्स ; युजीसीच्या सूचना
  
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने JEE Advanced 2024 साठी माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे.त्यानुसार विद्यार्थी 26 मे  रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत पेपर क्रमांक एक व दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत पेपर क्रमांक दोन घेण्यात येणार आहे.17 मे ते 26 मे या दरम्यान विद्यार्थ्यांना तयांचे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेता येणार आहे.परीक्षेची तातपूर्ती उत्तर सूची येत्या 2 जून रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.तर 2 व 3 जून रोजी त्यावर हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.त्यानंतर 9 जून रोजी अंतिम उत्तरसूची जाहीर केली जाणार आहे.15 जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे . 


JEE Advanced परीक्षेची पात्रता

* JEE मेन २०२४ च्या BE, B.Tech पेपरमधील सर्व श्रेणीतील पहिल्या २ लाख, ५० हजार  उमेदवारांपैकी एक उमेदवार असणे आवश्यक आहे.
* उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९९ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. एससी, एसटी उमेदवारांना पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे, अशा उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
* एका उमेदवाराला सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोन वेळा JEE Advance करण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी असेल.
* २०२३ किंवा २०२४ मध्ये प्रथमच १२ वीची परीक्षा  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य विषयांसह दिलेली  असणे आवश्यक आहे.
* जे  विद्यार्थी २०२२ मध्ये किंवा त्यापूर्वी पहिल्यांदा परीक्षेला बसले होते ते परीक्षेला बसण्यास पात्र राहणार नाहीत.