NEET RESULT : नीट परीक्षेचा निकाल जाहीर
नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातील श्रीनिकेथ रवी याने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या MBBS प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट NEET परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातील श्रीनिकेथ रवी याने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १८ लाख ७२ हजार ३३४ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तमिळनाडू येथील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती याने ७२० पैकी ७२० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या तनिष्का भगत हिने ७१० गुण मिळवत २७ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच रिद्धी वाजरिंगकर हिने ४४ वा क्रमांक पटकावला.
नीट परीक्षेत २०२२ मध्ये महाराष्ट्रातील २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले होते. तर २०२३ मध्ये परीक्षेस नोंदणी केलेल्या २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशात नीट परीक्षेच्या निकालात महाराष्ट्राचा २१ वा क्रमांक आहे.
‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये सुद्धा नीट परीक्षा देता येते. मराठी भाषेत नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१९ मध्ये ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी ,२०२० मध्ये ६२५८ विद्यार्थ्यांनी २०२१ मध्ये २,९१३ विद्यार्थ्यांनी २०२२ मध्ये २,३६८ विद्यार्थ्यांनी तर २०२३ मध्ये केवळ १,८३३ विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये नीट परीक्षा दिली आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.