Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवा; देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ उद्या संध्याकाळी ५.४५ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संध्याकाळी ५.३० वाजल्यानंतर चांद्रयान-3 लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे, असे UGC ने म्हटले आहे.

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवा; देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना
Chandrayaan 3 ISRO

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशाची मान उंचावणाऱ्या चांद्रयान-३ (Chandrayan 3) मोहिमेसाठी उद्याचा (दि. २३) दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. चांद्रयान-३ चे लॅंडिंग होणार असल्याने देशवासियांची उत्सुकता वाढली आहे. या ऐतिहासिक क्षणांचे विद्यार्थ्यांनाही साक्षीदार होता यावे, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

चांद्रयान-3 लँडिंगचे थेट प्रक्षेपण विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दाखवले जावे. तसेच  विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी एक विशेष संमेलन आयोजित केले जावे, असे निर्देश UGC  ने दिले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ उद्या संध्याकाळी ५.४५ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संध्याकाळी ५.३० वाजल्यानंतर चांद्रयान-3 लॅंडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे, असे UGC ने म्हटले आहे.

सरकारच्या एनओसी अभावी रखडले बीएड प्रवेश; ५० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

इस्रोच्या अधिकृत वेबसाइट (https://www.isro.gov.in/) आणि इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आणि डीडी नॅशनल संध्याकाळी ५:२७ वाजता चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. देशभरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, सादरीकरण अशा माध्यमांतून विद्यार्थ्यांना अंतराळ मोहिमांची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, चंद्रावर उतरण्यापूर्वी लँडर लोडची स्थिती तपासली जाईल. यावेळी कोणतीही अडचण समजली तर लँडिंग टाळून त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे देशवासियांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo