JEE मेन सत्र 1 चा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण 

जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 23  विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत, त्यात सर्वाधिक विद्यार्थी तेलंगणातील आहेत. 

JEE मेन सत्र 1 चा निकाल जाहीर;  महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने मंगळवारी पहाटे 3 वाजता JEE मेन्स परीक्षा सत्र 1 चा निकाल जाहीर (JEE mains result announced)केला आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 23  विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत, त्यात सर्वाधिक विद्यार्थी तेलंगणातील असून महाराष्ट्रातील 3  विद्यार्थी आहेत.

जेईई मेन्स परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी  देशभरातून 11.70 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. 100%  स्कोअर मिळवलेल्या विद्यार्थ्यांपैकी 7  तेलंगणातील, प्रत्येकी 3  आंध्र प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र , तसेच  हरियाणा व दिल्लीतील प्रत्येकी 2 तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी 1 विद्यार्थी आहे. 

परीक्षेचे पहिले सत्र  जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होते, दुसरे  सत्र  एप्रिलमध्ये नियोजित आहे. JEE-Mains पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालांच्या आधारे, JEE-Advanced परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना निवडले जाईल.  जी 23 प्रमुख भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पात्र असतील. JEE मेन्स सत्र 2 नोंदणी विंडो देखील खुली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 2 मार्च 2024 पर्यंत वेळ आहे. इच्छुक उमेदवार jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन JEE मुख्य सत्र 2 साठी नोंदणी करू शकतात. 

JEE मेन्स परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये घेण्यात आली होती.
भारताबाहेर परीक्षा मनामा, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, कुवेत सिटी, लागोस/अबुजा, कोलंबो, जकार्ता, मॉस्को, ओटावा, पोर्ट लुईस, बँकॉक आणि वॉशिंग्टन डीसी, क्वालालंपूर येथे देखील आयोजित करण्यात आला होता. जेईई मेन प्रथमच अबू धाबी, हाँगकाँग आणि ओस्लो येथे घेण्यात आले.

जेईई मुख्य निकाल करा याप्रमाणे डाउनलोड 
*JEE Main jeemain.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* JEE मुख्य निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
* साइन इन बटणावर क्लिक करा.
* जेईई मेन 2024 स्कोअरकार्ड आणि रँक तपशील स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील.
*भविष्यातील वापरासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या