कृषी सेवक भरती २०२३-२४ : कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर

निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलवण्यात येत असून त्यासंबंधितचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

कृषी सेवक भरती २०२३-२४ : कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्या मार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी कृषी सेवक (krushi sevak 2023-24) पदासाठीची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जातील माहितीच्या आधारे व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार अंतरिम निवड यादी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी (Document Verification) करण्यासाठी बोलवण्यात येत असून त्यासंबंधितचे सविस्तर वेळापत्रक जाहीर (Schedule announced) करण्यात आले आहे. 

निवड सूचीमध्ये कृषी सेवक या पदासाठी अंतरिम निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे, त्या पुढे प्रवर्ग देण्यात आला आहे. हे पत्र म्हणजे उमेदवारांच्या  नियुक्तीचे आदेश नसून अंतरिम निवड यादीतील संभाव्य निवड होणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करण्यासाठी दिलेले पत्र आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीच्या दोन साक्षांकीत संचासह येत्या  २४ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उमेदवारांना पत्रात पाठवण्यात आलेल्या कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. 

आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे

शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील पदवी / पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केल्याचे प्रमाणपत्र. संगणक हाताळणीबाबत D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा ० स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ यांचेकडील अधिकृत MSCIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. वयोमर्यादा तपासणी करीता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची मूळ प्रत. ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे त्या बाबतचे जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र. शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका/पदवी किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मिळालेली अशी इतर कोणतीही शैक्षणिक अर्हता / उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक. महाराष्ट्र नागरीसेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना अ प्रमाणपत्र. वैध असलेले उन्नत आणि प्रगत (नॉनक्रिमिलेअर) गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी तपासणी करुन दिलेले प्रमाणपत्र. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतचे प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. माजी सैनिक असल्यास संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व डिश्चार्ज बुक. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी (Domicile) असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र. उमेदवार प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त असल्याबाबतचे जिल्हा पुनर्वसन अधिका-यांचे प्रमाणपत्र. उमेदवार प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त असल्याबाबतचे जिल्हा पुनर्वसन अधिका-यांचे प्रमाणपत्र. उमेदवार खेळाडू असल्यास राज्यस्तर / राष्ट्रीयस्तर / आंतरराष्ट्रीयस्तर मधील प्राविण्य असल्यास कोणते स्थान प्राप्त केले आहे. त्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व सदर प्रमाणपत्र पडताळणी केल्याचा सक्षम प्राधीकाऱ्याचा दाखला मुळ प्रत. उमेदवार अंशकालीन कर्मचारी असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचा दाखला. ऑनलाईन अर्ज दाखल करतेवेळी शुल्क भरणा केल्याचा पुरावा तसेच ऑनलाईन अर्जाची साक्षांकीत प्रत. दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगात्वाचे प्रमाण ४० टक्के असणे आवश्यक असून तसे संबधित जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्राधिकृत मंडळाचे संगणकीकृत मूळ प्रमाणपत्र. अनाथ असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र. नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचे अधिसूचित राजपत्र. अलिकडील काळातील पासपोर्ट / पारपत्र आकाराचा एक फोटो तसेच उमेदवारांचे ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / वाहनपरवाना इ. पैकी एक) वरील पैकी तुमच्या संबंधित असलेली सर्व कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.