विद्यापीठातील वादाला गृहमंत्र्यांचे अभय आहे का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही.शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही.

विद्यापीठातील वादाला गृहमंत्र्यांचे अभय आहे का ?   सुप्रिया सुळे यांचा सवाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

" सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai PhulePune University) खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण (Beating poor students) करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने मुलांना मारहाण केली याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. तसेच गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा." अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Nationalist Congress Party MP Supriya Sule) यांनी केली आहे.त्यामूळे विद्यापीठातील घटनेला आता राजकारणांचा भाग बनला असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : SPPU News : विद्यापीठात सुरक्षा वाढवली; मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी, बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या शाब्दिक चकामकीनंतर हाणामारी झाली.या प्रकरणी पोलिसांनी संघटनांच्या कार्यकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल केले.त्यामुळे विद्यापीठात टणावाचे वातावरण निर्माण झाले.ही घटना ताजी असताना विद्यापीठातील वसतीगृहातील भिंतीवर पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची घटना समोर आली. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. यादरम्यान काही विद्यार्थीई संघटना आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात पुन्हा वाद झाला. या सर्व घटनांमुळे या विषयाला आता राजकीय वळण लागले आहे. त्यामुळेच " पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही.शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही. " अशी टीका सुप्रिया सुळे यांनी ट्विटर द्वारे केली आहे.

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलनला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी",असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.