CTET २०२४ परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात 

परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना  ctet.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरूता  येईल . पात्र उमेदवारांना येत्या २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

CTET २०२४ परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  (CBSE)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (Central Teacher Eligibility Test- CTET) साठी शुक्रवारपासून  (दि.३ ) नोंदणी  सुरू करण्यात आली आहे.परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना  ctet.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरूता  येईल . पात्र उमेदवारांना येत्या २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

हेही वाचा: नोकरी शोधणे झाले सोपे; ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट पोर्टल

सीबीएसईतर्फे येत्या २१ जानेवारी २०२४ रोजी CTET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. देशभरातील १३५ शहरांमध्ये जानेवारी सत्रासाठी वीस भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.या सीटीईटी परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर १ आणि २  सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात येतात. पेपर १ हा इयत्ता पहिली ते ५ वी  साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी तर पेपर २ हा इयत्ता सहावी  ते आठवी च्या वर्गांसाठी  शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
 
सीबीएसई- सीटेट ही परीक्षा एमसीक्यू पध्दतीने अर्थात बहुप्रश्न पध्दतीने घेतली जाते.या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल आणि निगेटिव्ह मार्किंग नसते.सीबीईएसई- सीटेट च्या एका पेपरसाठी ओपन /ओबीसी/इडब्ल्यू  संवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये परीक्षा शुल्क असून एससी /एसटी उमेदवारांना पाचशे  रुपये शुल्क आहे. 

प्राथमिक/कनिष्ठ दोन्ही पेपरसाठी ओपन /ओबीसी/इडब्ल्यू  उमेदवारांना बाराशे रुपये शूलक असून आणि एससी /एसटी उमेदवारांना ६०० रुपये शुल्क आहे.परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई चालानद्वारे भरता येणार आहे.
सीबीईएसई- सीटेट पेपर १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह उच्च  माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेला बसण्यासाठी 2 वर्षांची D.El.Ed परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सीबीएसई- सीटेट पेपर २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी. जे उमेदवार  बीएड प्रोग्राममध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत  ते उमेदवार  देखील परीक्षेस अर्ज करू शकतात.