SPPU News : विद्यापीठात सुरक्षा वाढवली; मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी, बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित

विद्यापीठात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत असून सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

SPPU News : विद्यापीठात सुरक्षा वाढवली; मुख्य प्रवेशद्वारावर नोंदणी, बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विद्यार्थी वसतीगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. तसेच दोन दिवसांपुर्वीच दोन संघटनांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या घटनांनंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून आवारात प्रवेश करण्याबाबत बंधने आणली आहेत. (Savitribai Phule Pune University)

 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल प्रवार यांनी याबाबत निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही व्यक्ती सदर मजकूर समाज माध्यमातून प्रसारित करून त्यास प्रसिद्धी देऊन सदर कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या सर्व संबंधितांविरुद्ध चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

SPPU News : भाजपच्या आंदोलनादरम्यान राडा; दोन मुलींसह चार विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने पेटला वाद

 

विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करीत आहे. विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे. सदर प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात येत आहे की विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

 

विद्यापीठात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत असून सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी नोंदणी करून प्रवेश देण्यात येईल, तसेच सर्व वसतीगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिकद्वारे प्रवेश देण्यात येईल, असे कुलसचिव पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k