आश्रमशाळांना वस्तूंचा पुरवठा बंद होणार; विद्यार्थ्यांनाच मिळणार पैसे

राज्य शासनाच्या सुधारित खरेदी धोरणानुसार थेट लाभ हस्तांतर प्रक्रियेवर भर दिला जात आहे. वस्तूंची खरेदी करुन पुरवठा न करता थेट निधी लाभार्थ्यांना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. 

आश्रमशाळांना वस्तूंचा पुरवठा बंद होणार; विद्यार्थ्यांनाच मिळणार पैसे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) शासकीय आश्रमशाळांसाठी (Aashramshala)  त्यामधील विद्यार्थ्यासाठी विविध वस्तू, साहित्य खरेदी आता बंद केली जाणार आहे. त्याऐवजी थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) निधी जमा केला जाणार आहे. त्यामुळे वस्तू खरेदीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Government)

 

राज्य शासनाच्या सुधारित खरेदी धोरणानुसार थेट लाभ हस्तांतर प्रक्रियेवर भर दिला जात आहे. वस्तूंची खरेदी करुन पुरवठा  करता थेट निधी लाभार्थ्यांना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने  श्रमशाळेतील विद्यार्थाना देण्यात येणाऱ्या काही स्तूंची खरेदी न करता त्यासाठीचा निधी थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; शाळांच्या वेळा बदलण्याचे न्यायालयाचे आदेश

 

शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तु खरेदी करुन उपलब्ध करुन  देता त्याऐवजी अनुदान विद्यार्थी/पालक यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्या येणार आहे. गणवेश संच, नाईट ड्रेस, शालेय साहित्य  लेखनसामुग्री या बाबी थेट लाभ द्यावयाच्या वस्तुमधून वगळण्यात आलेल्या आहेत.

 

प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रति विद्यार्थी वस्तू किंवा साहित्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी खरेदी करावयाच्या वस्तूंचे परिमाण  संख्या (Specification and Number) निश्चित करुन वस्तूनिहाय खरेदी किंमत निश्चित करण्यात येईल. खरेदी किंमत निश्चित करतांना त्या वस्तूच्या निश्चित परिमाणानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅन्डेड वस्तुच्या किरकोळ विक्री किंमतीचा (MRP) आधार घेऊन त्यानुसार वस्तुची किंमत निश्चित केली जाईल.

 

विद्यार्थी उन्हाळयाच्या सुट्टीवर जातांना विद्यार्थ्यांना वर्ग निहाय कोणत्या वस्तूंसाठी रक्कम मिळाली आहे, त्यावस्तूंचे परिमाण  संख्या यांची यादी मुख्याध्यापकांनी विद्यार्थी  पालकांना उपलब्ध करुन द्यावी, अशा सुचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना देय रक्कम दि.  जुन ते १० जुन दरम्यान खात्यात जमा करण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिमाणा प्रमाणे वस्तुची खरेदी केली आहे किंवा कसे, याची शाळास्तरावरील शिक्षक/ मुख्याध्यापक / अधिक्षक यांचे मार्फत खात्री करण्यात येईल.

 

या वस्तूंऐवजी मिळणार पैसे (वर्षासाठी वस्तूंची संख्या) -

अंघोळीचा साबण (१०), कपडे धुण्याचा साबण (३०), खोबरेल तेल (१०), टुथपेस्ट (१०), टुथब्रश (४), कंगवा (२), नेलकटर (२), मुलींसाठी निळ्या रीबन (जोड) (४), रेनकोट किंवा छत्री (१), वुलन स्वेटर (तीन वर्षातून एकदा) (१), अंडर गारमेंट (२), टॉवेल (१), सॅंडल किंवा स्लीपर (१).

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k