कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट टाटा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेशासाठी पात्र

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने संलग्नता दिलेल्या १ हजार २६५ संस्थांमध्ये मंडळाचे काही तासांपासून, सहा महिने, एक वर्ष व दोन वर्ष कालावधीचे अर्धवेळ व पूर्णवेळ असे ३६५ अभ्यासक्रम आहेत.

कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट टाटा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेशासाठी पात्र
TISS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या दोन वर्षे कालावधीच्या २३ पदविका (Diploma) अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना Tata Institute of Social Sciences (TISS) अंतर्गत व्यवसाय पदवी (Bachelor of Vocation) अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.   

मंडळाने संलग्नता दिलेल्या १ हजार २६५ संस्थांमध्ये मंडळाचे काही तासांपासून, सहा महिने, एक वर्ष व दोन वर्ष कालावधीचे अर्धवेळ व पूर्णवेळ असे ३६५ पदविका (Diploma), प्रगत पदविका (Advance Diploma) व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांत (Certificate Course) प्रशिक्षण देण्यात येत आहे.

11th Admission : पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा, अन्यथा एका फेरीतून व्हाल बाद; सविस्तर माहिती व वेळापत्रक पहा...

मंडळाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता ही केवळ साक्षर (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) पासुन पदव्युत्तर (प्रगत पदविका अभ्यासक्रम) आहे. मंडळाच्या अभ्यासक्रमांचा मुळ उद्देश हा युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविणे आहे. मंडळाच्या अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधीदेखील उपलब्ध करुन देण्यासाठी मंडळाचे दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणाच्या +२ स्तराची समकक्षता (Equivalence) निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

11th Admission : अकरावीचे 'कोटा अंतर्गत' दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

यापार्श्वभूमीवर Tata Institute of Social Sciences संस्थेने मंडळाचे दोन वर्षे कालावधीच्या २३ पदविका अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय पदवी (Bachelor of Vocation) अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पात्र केले आहे. संस्थेच्या व्यवसाय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या संबधीचे परिपत्रक व प्रवेशाची Link मंडळाच्या संकेतस्थळावर “उच्च शिक्षणाच्या संधी” या मथाळ्याखाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo