NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा

एनसीईआरटीने गेल्या वर्षी यूजीसीकडे अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. कौन्सिलने ‘डी नोव्हो’ (De Novo) श्रेणीअंतर्गत अर्ज केला होता.

NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा
NCERT Deemed University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT ला आता अभिमत विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल. या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी शुक्रवारी केली आहे. एनसीईआरटीच्या ६३व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधान यांनी ही घोषणा केली.

 

एनसीईआरटीने गेल्या वर्षी यूजीसीकडे अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. कौन्सिलने ‘डी नोव्हो’ (De Novo) श्रेणीअंतर्गत अर्ज केला होता. यूजीसीच्या नियमांनुसार या श्रेणीतील ज्या संस्था ज्ञानाच्या क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्या आणि ज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात येतो.

नवव्या वर्षी दहावी अन् २१ व्या वर्षी पीएच.डी. झालेला तथागत चार वर्षांपासून बेरोजगार

एनसीईआरटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे आता येथून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदव्या घेता येऊ शकतात. याशिवाय आता नवीन अभ्यासक्रमाची रचना करणे, परीक्षा आयोजित करणे आदी कामेही NCERT कडून केली जातील.

 

NCERT ही शालेय शिक्षणाची सर्वोच्च संस्था आहे. एनसीईआरटी देशात शैक्षणिक संशोधन आणि नवोपक्रम, अभ्यासक्रम विकास, अभ्यासक्रमाचा विकास आणि अध्यापन-शिक्षण सामग्रीसह विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करते. याशिवाय विविध प्रकारचे शैक्षणिक संशोधन आणि नाविन्य, अभ्यासक्रम विकास आदी कामेही त्यांच्याकडून केली जातात. NCERT मध्ये  शिकवण्याच्या पद्धतींवरही संशोधन केले जाते.

 

सध्या शिक्षकांसाठी एनसीईआरटीकडून काही अभ्यासक्रमही राबविले जातात. पण त्यासाठी इतर विद्याठांची संलग्नता आवश्यक असता. त्यांच्या सहमतीशिवाय नवीन अभ्यासक्रम सुरू करता येत नाही. आता विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे एनसीईआरटीला स्वतंत्रपणे अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo