नवीन शैक्षणिक धोरणावरील विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळणार.. 

 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' च्या अंमलबजावणीत विद्यार्थी आणि पालक अत्यंत महत्वाचे घटक असल्याने त्यांना या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणावरील विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळणार.. 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या new education policy अंमलबजावणी संदर्भात पालक व विद्यार्थ्यांच्या parents and student मनात विविध प्रश्न निर्माण झाले  आहेत. या सर्व प्रश्नांची  उत्तरे त्यांना तज्ज्ञांकडून जाणून घेता यावीत, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  University of pune  महाराष्ट्रात प्रथमच  विद्यार्थी व पालकांसाठी येत्या ६ एप्रिल रोजी ऑनलाईन व ऑफलाईन जनजागृती कार्यक्रमाचे Awareness program आयोजन केले आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University प्र -कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' च्या अंमलबजावणी विद्यार्थी आणि पालक अत्यंत महत्वाचे घटक असल्याने त्यांना या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.या संदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्र.कुलगुरू डॉ संजीव सोनवणे बोलत होते. डॉ. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक रविंद्र शिंगणापूरकर , अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाचे संचालक डॉ संजय ढोले यावेळी उपस्थित होते.
        रविंद्र शिंगणापूरकर म्हणाले , पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी ३ ते ५ यावेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि आयसीटी मुंबई येथील प्राध्यापक डॉ.आर.डी. कुलकर्णी तसेच जळगावच्या एम.जे. महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.अनिल राव यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

पालकांच्या मनातील कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात ?

१) इयत्ता बारावीनंतर चारवर्षांचा पदवी अभ्यासक्रम कसा असेल. 

२) केव्हापासून नवी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबाजावणीला सुरूवात होईल. 

३) अंतर्विद्याशाखीय अभ्यासक्रमात कोणते विषय निवडता येऊ शकतात. 

४) व्यावसायीक अभ्यासक्रमामध्ये सुध्दा बदल होणार का ? 

५) मेडिकल ,फार्मसी आदी अभ्यासक्रमांचे सुद्धा स्वरूप बदलणार आहे का ?