Savitribai Phule Pune University : मराठी पाट्यांचे वादळ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

युवासेनेच्या वतीने विद्यापीठात मराठी पाट्या लावण्याची सूचणा करण्यात आली आहे.

Savitribai Phule Pune University : मराठी पाट्यांचे वादळ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात
Savitribai Phule Pune University News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Savitribai Phule Pune University News : महाराष्ट्रात दुकानावर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले . त्यानंतर मराठी पाट्या लावण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले .आता या मराठी पाट्यांचे वादळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत  (Pune University) येऊन ठेपले आहे. युवा सेनेच्या वतीने विद्यापीठात मराठी पाट्या लावण्याची सूचना करण्यात आली आहे.  

युवा सेनेने सावित्रीबाई पुणे विद्यापीठामधील सर्व मेस, उपहारगृह व फुटमॉलमधील दुकांनांवर मराठी पाट्या लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी युवासेनेच्या वतीने विद्यापीठातील उपहारगृहे आणि फुड मॉलमधील गाळाधारकाना मराठी पाट्या लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : PWD JE TCS paper leak : आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेचा पेपर फुटला ? 

येत्या तीन दिवसांत सर्व पाट्या बदलल्या गेल्या नाहीत तर शिवसेना (Shivsena) स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहाराध्यक्ष राम थरकुडे यांच्या उपस्थितीत सर्व गाळाधारकांना पाट्या बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी युवक काँग्रेसच्या (Congress) वतीने आदिनाथ जाविर, अविनाश कांबळे, मयुर जावळे, अक्षय कारंडे , सुनिल गोरडे गोर्डे हे विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'' सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) आदेश आहे की सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानांवर मराठी पाट्या लावल्या पाहिजे. विद्यापीठामधील सर्व गाळा धारकांना युवासेनाच्या वतीने पाट्या बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीकडे देखील याची तक्रार करण्यात आली आहे.

'' राम थरकुडे ( युवासेना शहरध्यक्ष, पुणे शहर )