ना अभ्यासक्रम, ना वर्ग, गणवेश अन् बेंचही नाहीत! मधुराणी प्रभुलकर यांची मुलगी शिकते या शाळेत

मधुराणी यांच्या मुलीचे नाव स्वराली आहे. ती पुण्यातील ‘गोकुळ’ या शाळेत शिकते. डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत.

ना अभ्यासक्रम, ना वर्ग, गणवेश अन् बेंचही नाहीत! मधुराणी प्रभुलकर यांची मुलगी शिकते या शाळेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आदर्श आई, आदर्श सून अन् आदर्श पत्नी म्हणून अरुंधती हे पात्र घराघरांत पोहचले आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) यांनी हे पात्र साकारले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातही एक महत्वाचा निर्णय घेत आपल्या मुलीला एका आगळ्यावेगळ्या शाळेत प्रवेश घेतला आहे. या शाळेत ना  बोर्ड, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंच नाहीत, गणवेश नाही. ही शाळा आहे पुण्यातील (Schools in Pune).

 

मधुराणी यांच्या मुलीचे नाव स्वराली आहे. ती पुण्यातील ‘गोकुळ’ या शाळेत शिकते. डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत. काही दिवसांपुर्वीच मधुराणी या स्वरालीच्या शाळेत कविता शिकवायला गेल्या होत्या. त्यांनी याबाबचा फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. त्यामुळे या शाळेबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर मुधराणी यांनीच एका मुलाखतीत या शाळेबाबत माहिती दिली.

शाळा दत्तक घेण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळात शिक्कामोर्तब

 

स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव सोहळ्याच्या रेडकार्पेटवर हंच मीडिया या युट्युब चॅनेलला मधुराणी यांनी ही मुलाखत दिली आहे. स्वराली ही पुण्यात शाळा शिकते. पण मधुराणी यांना शुटिंगसाठी सतत मुंबईत राहावे लागते. पण मुंबईत गोकुळसाऱखी शाळा नसल्याने तिला मुंबईत आणत नसल्याचे त्यांनी सांगितले. ती पक्की पुणेकर असल्याचे सांगत मधुराणी म्हणाल्या, तिची शाळा वेगळ्याप्रकारची आहे. ही शाळा ज्या प्रकारची आहे, तशी शाळा मला इथे मुंबईत मिळाली तर तिला ताबडतोब घेऊन येईल. शाळेत बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंच नाहीत, गणवेश नाही. पुण्यात गोकुळ नावाची ही शाळा आहे. डॉ. ज्योत्स्ना पेठकर या ही शाळा चालवतात.

 

मुलीची जडणघडण, स्वभावाला खूप अनुरूप अशी ही शाळा आहे. त्यामुळे ती चांगल्या हातात असल्याचे वाटते. प्रत्येकाने कळपाचा भाग असलेच पाहिजे असे काही नाही. आपल्या मुलातील वेगळेपण ओळखून त्याला त्यादृष्टीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे. दहा जण असे करतात म्हणून तून तसे करायला पाहिजे, असे नाही. कुठल्या ना कुठल्या पध्दतीने राजहंसाचे गुण प्रत्येक मुलात असतात. ते ओळखता आले पाहिजेत. त्यासाठी पालकांनीही सजग असायला हवे. असेही मधुराणी म्हणाल्या.

 

दरम्यान, स्वरालीच्या ' गोकुळ ' शाळेत मधुराणी या कविता शिकवायला गेल्या होत्या. त्याविषयी त्यांनी सोशल मीडियात लिहिले होते की, कुसुमाग्रज, गदिमा, शांता शेळके, विंदा अशा मोठमोठ्या कवींच्या कविता अर्थ समजून घेत घेत आम्ही एकत्र म्हंटल्या. मुलांचा उत्साह , प्रत्येक कवितेतून अर्थ उलगडताना त्यांचे कुतूहलाने लुकलूकणारे डोळे, 'अजून एक , अजून एक कविता' अशी त्यांची आर्जवं... हे सगळंच फार प्रेमात पडणारं होतं. ह्याच वयात मुलांना आपण कवितेची गोडी लावली, त्यातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची ओळख करून दिली तर आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात मनावर फुंकर घालणारी जन्मभराची एक सखीच मिळवून दिलं. मुलांबरोबर कविता गायला हव्यात ... त्यातला निर्मळ आनंद असा लुटत राहायला हवा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j