Pune News : पुणे पुस्तक महोत्सवात कुमार विश्वास, विक्रम संपत अन् सौरभ द्विवेदींना ऐकण्याची संधी

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नामांकित विचारवंतांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Pune News : पुणे पुस्तक महोत्सवात कुमार विश्वास, विक्रम संपत अन् सौरभ द्विवेदींना ऐकण्याची संधी
Kumar Vishwas, Saurabh Dwivedi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :

Pune News : पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी (ता.18 डिसेंबर) रोजी एकाच दिवशी पुणेकरांना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत आणि लल्लनटॉप फेम पत्रकार सौरभ द्विवेदी यांचे विचार ऐकता येणार आहेत. हे तिन्ही कार्यक्रम विनामूल्य असल्याने, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे (Rajesh Pandey) यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यातच सोमवारी दुपारी 12 वाजता कुमार विश्वास यांचा 'कवि की कलम से' हा कार्यक्रम फर्ग्युसनाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde)  उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : PWD JE TCS paper leak : आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेचा पेपर फुटला ?

दुपारी 4 वाजता सौरभ द्विवेदी यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर दुपारी 5.30 वाजता लेखक विक्रम संपत हे स्वातंत्र्यवीर सावरकर समज आणि गैरसमज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम फर्ग्युसनमध्ये होणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नामांकित विचारवंतांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे. 

प्रमुख कार्यक्रम

- स्टोरी टेलिंग - सकाळी 10.30
- सकाळी 11.30 वाजता विद्यार्थ्यांसाठी मंडाला आर्ट कार्यक्रम होणार आहे.
- दुपारी 12.30 वाजता वेदिक मॅथेमॅटिक्स हा कार्यक्रम होईल.
- दुपारी 1.30 वाजता टॅलेंट हंट.
- सायंकाळीं 6.30 वाजात काश्मिरी बँड