प्रशांत मुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर सदस्यपदी नियुक्त 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर डॉ. प्रशांत मुळे यांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड. संदीप कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत मुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर सदस्यपदी नियुक्त 
Annasaheb Magar college

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे annasaheb magar college उपप्राचार्य  डॉ. प्रशांत मुळे Dr.prashant mulye यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा savitribai phule pune university व मूल्यमापन मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली.याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे pune jilha shikshan mandal मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अ‍ॅड. संदीप कदम sandip kadam यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव, महाविद्यालयायीन विकास समिती सदस्य निलेश मगर,महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.नितीन घोरपडे,फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी शेवाळे उपस्थित होते.

 डॉ. प्रशांत मुळे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणक शास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे.डॉ.प्रशांत मुळे यांनी या पूर्वी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर व समित्यांवर काम केले आहे. कार्यक्रमास महाविद्यालयाचे  उपप्राचार्य डॉ.शुभांगी औटी,प्रा.अनिल जगताप,प्रा.डॉ.नेहा पाटील,डॉ.एन.एन.भुजबळ,प्रा.डॉ.नाना झगडे,प्रा.नितीन लगड,कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे आदी उपस्थित होते.

-------------------