सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कलगुरूंच्या नावाची घोषणा २२ जुलैला?

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नवीन कुलगुरू हे प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांची निवड करतात. पूर्वी राज्यपालांतर्फे प्र-कलगुरूंची नियुक्ती केली जात होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कलगुरूंच्या नावाची घोषणा २२ जुलैला?
SPPU Vice Chancellor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांची नियुक्ती झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू (Pro Vice Chancellor) पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. परंतु, येत्या २२ जुलै रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असून त्यात प्र-कुलगुरू पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाला लवकरच प्र-कुलगुरू मिळणार आहेत. (Savitribai Phule Pune University)

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नवीन कुलगुरू हे प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांची निवड करतात. पूर्वी राज्यपालांतर्फे प्र-कलगुरूंची नियुक्ती केली जात होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाते. मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची निवड प्रक्रिया कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर आठवड्याभरात पूर्ण झाली. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

SPPU News : विद्यापीठातील अनेक विभाग पडणार ओस, २५ अभ्यासक्रमांना जागांपेक्षा कमी अर्ज

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालय मधील तसेच विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती कुलगुरू पदाप्रमाणेच प्र-कुलगुरू पदासाठी सुध्दा इच्छुक आहेत. त्यात विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता एम. जी. चासकर, विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे, माजी अधिष्ठाता व स.प. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक चासकर यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांना मंगळवारी (दि.११) येत्या २२ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कळविण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा अजेंडा अद्याप ठरलेला नाही. परंतु, पुढील काही दिवसात हा अजेंडा ठरणार आहे.त्यात प्र-कलगुरू नियुक्तीचा विषय मांडला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. बहुतांश सर्व शैक्षणिक विषय प्र-कुलगुरूंच्या माध्यमातून हाताळले जातात. त्यामुळे अनुभवी आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सक्षमपणे राबवणारा व्यक्ती प्र-कुलगुरू पदी निवडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD