'ते' विद्यार्थी डार्विनचा सिध्दांत शिकू शकणार नाहीत, हा मुद्दा योग्य; धर्मेंद्र प्रधान यांचे विधान

प्रधान यांनी मंगळवारी पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अभ्यासक्रमांतील बदलानंतर झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली.

'ते' विद्यार्थी डार्विनचा सिध्दांत शिकू शकणार नाहीत, हा मुद्दा योग्य;  धर्मेंद्र प्रधान यांचे विधान
Union Education Minister Dharmendra Pradhan

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व आणि प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातून डार्विनचा उत्क्रांतीच्या सिध्दांताचा (Darwins theory of Evolution) भाग वगळण्यात आला आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी पुण्यात मोठे विधान केले आहे. इयत्ता दहावीनंतर विज्ञान शाखेत (Science Stream) प्रवेश न घेणारे विद्यार्थी उत्क्रांतीचा सिध्दांत शिकू शकणार नाहीत, हा मुद्दा योग्य असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे 'एनसीईआरटी'ने केलेल्या बदलांवरच त्यांनी बोट ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रधान यांनी मंगळवारी पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अभ्यासक्रमांतील बदलानंतर झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विनचा सिध्दांत आणि आवर्त सारणी वगळण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. पण हे खरे नाही. मी एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कोरोना काळात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रमातील द्विरुक्ती झालेला भाग कमी करता येऊ शकतो आणि नंतर जोडता येईल, यावर चर्चा केली होती.

सध्याचे द्विलक्षी अभ्यासक्रम बंद होणार; नवीन अभ्यासक्रम ठरले, राज्य सरकारचा निर्णय

इयत्ता सातवी, आठवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात काहीही बदल केला नाही. दहावीच्या पुस्तकामधून मागील वर्षी आणि यंदाही उत्क्रांतीचा काही भाग वगळण्यात आला आहे. इयत्ता अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रमही बदलला नाही. पण दहावीनंतर विद्यार्थी विज्ञान शाखेत गेले नाहीत तर त्यांना डार्विनचा सिध्दांत कळणार नाही, हा तर्क योग्य आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

शालेय साहित्य महागल्याने खासदार सुप्रिया सुळे यांची नाराजी; केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली महत्वाची मागणी

इयत्ता नववी, अकराव आणि बारावीमध्ये आवर्त सारणी शिकवली जात असल्याचे सांगत प्रधान यांनी त्या वादावरही पडदा टाकला. दहावीच्या पुस्तकातील एक किंवा दोनच उदाहरणे वगळली असल्याचे एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील काही दिवसांत इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके विद्यार्थ्यांना मिळतील. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांवर काम सुरू असल्याचे प्रधान म्हणाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo