CUET UG परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत  ४१ टक्क्यांनी वाढ 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी  या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

CUET UG परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत  ४१ टक्क्यांनी वाढ 
CUET UG 2023 Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

CUET UG 2023 : पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG) परीक्षा घेतली होती. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी CUET UG ची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी  या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. CUET-UG २०२३ मध्ये विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती ७४.४ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण ६५ टक्के होते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ दर्शवते की विद्यार्थी CUET-UG ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची मानतात, असे कुमार यांनी सांगितले.

CUET UG 2023 : तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, मराठीतील फक्त तीन

यावर्षी CUET UG परीक्षेला सुमारे १४ लाख ९० हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती तर १३ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. केंद्रीय, राज्य, अभिमत आणि इतर सहभागी खाजगी विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांच्या पदवीपूर्व कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा गेल्या वर्षी म्हणजे २०२२ पासून सुरु करण्यात आल्या होत्या.

दरम्यान शनिवारी NTA ने  CUET UG चा निकाल  घोषित केला होता. यामध्ये २२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यंदा ही  परीक्षा वेगळ्या वेगळ्या स्थानिक आणि परदेशी अशा ३३ भाषणामध्ये घेण्यात आली होती.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD