शिक्षकांना अशैक्षणिक कामांविरोधात कोल्हापुरात ३० तारखेला मोर्चा; आमदार आसगावकर यांची माहिती

आमदार आसगावकर यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

शिक्षकांना अशैक्षणिक कामांविरोधात कोल्हापुरात ३० तारखेला मोर्चा; आमदार आसगावकर यांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे तसेच शिक्षणाचे होणारे खाजगीकरण (Privatisation) याला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात (Kolhapur) ३० सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयंत आसगावकर (MLC Jayant Asgaonkar) यांनी दिली. माझा निधी रस्ते, गटारी यासाठी न वापरता तो शैक्षणिक कामासाठीच वापरणार असल्याचे आसगावकर यांनी सांगितले.

 

आमदार आसगावकर यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आसगावकर यांनी श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (भवानीनगर), श्री नीलकंठेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज, नंदिकेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज (जंक्शन), जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, श्री संत मुक्ताबाई विद्यालय (शेळगाव), सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज या शाळांना भेट दिली. त्यांच्यासोबत प्राचार्य गणपतराव तावरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राम पाडुळे, दादासाहेब गवारे, मुख्याध्यापक बी. बी. शिंदे, जे. एन. पाटील, सुभाष गायकवाड, लावंडे सर, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

मुक्त विद्यालय मंडळ : इयत्ता पाचवी व आठवीसाठी नोंदणीला मुदतवाढ

 

शिक्षकांशी संवाद साधताना आसगावकर म्हणाले, शिक्षण विभाग हा शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष राहिलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात खूपच प्रश्न प्रलंबित आहेत. अघोषितांचा प्रश्न असो वा जुनी पेन्शनचा प्रश्न, अथवा अन्य प्रश्न ते सोडवण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. जुन्या पेन्शन तुमच्या हक्काची असून ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी आम्ही कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला. यानंतर संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे मोर्चे निघाले.

 

ज्या शाळा घोषित झाल्या, त्यांना शालार्थ आयडी मिळावेत, यासाठी माझा पुणे आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे तसेच शिक्षणाचे होणारे खाजगीकरण याला विरोध करण्यासाठी आम्ही कोल्हापुरात ३० सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार आहे., असे आसगावर यांनी सांगितले.

 

भेटीदरम्यान श्री छत्रपती हायस्कूलचे प्राचार्य रमेश मचाले, मुख्याध्यापक दादासाहेब शिंदे, रमेश जाधव, लोखंडे सर, गोसावी सर, श्री निलकंठेश्वर विद्यालयाचे प्राचार्य रमेश लोंढे, रयतचे जनरल बॉडी सदस्य अमोल पाटील, मलगुंडे सर, खताळ सर, आवाळे सर. नंदिकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सोळशे, प्राचार्य पाटील सर, सहशिक्षक बी. डी. शिंदे, लावण सर. श्री संत मुक्ताबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय गावडे, भागवत भुजबळ, साहेबराव शिंगाडे, मारकड सर, विजय पवार. सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाचे प्राचार्य शिंगारे सर, मुख्याध्यापक फलफले सर, जगदाडे सर, जानकर सर, सुभाष गायकवाड, लावंड सर, पाटील सर, मगर सर, दडद सर, मोहिते सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j