QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण; ७ विद्यापीठे टॉप १०० मध्ये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २५.९ गुण मिळवत २१० वा  क्रमांक  मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ २०७ क्रमांकावर होते. तर यावर्षीच्या रँकिंग मध्ये २६२-२७० यादरम्यान सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण; ७ विद्यापीठे टॉप १०० मध्ये
QS Asia University Ranking 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ (QS Asia University Ranking 2024) जाहीर करण्यात आली आहे. भारतातील ७ विद्यापीठांनी (Top Indian Universitis) टॉप १०० मध्ये स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबईला (IIT Mumbai) ४० वा तर आयआयटी दिल्लीला ४६ वा क्रमांक मिळाला आहे. QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील १४८ विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाचाही (SPPU) समावेश आहे. पण विद्यापीठाचे रँकिंगमधले स्थान मात्र घसरले आहे.

 

QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये IIT मद्रासला ५३ वा, IISc ला ५२ वा रँक मिळाला आहे आणि IIT खरगपूरला ६१ वा क्रमांक मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २५.९ गुण मिळवत २१० वा  क्रमांक  मिळाला आहे. मागच्या वर्षीच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ २०७ क्रमांकावर होते. तर यावर्षीच्या रँकिंग मध्ये २६२-२७० यादरम्यान सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा समावेश झाला आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ ३५१-४०० च्यादरम्यान होते. 

परदेशी विद्यापीठांसाठी UGC ने जाहीर केली नियमावली; भारतात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियम

 

आयआयटी मुंबईने एकूण ६७.२ गुण मिळवले आहेत. आयआयटी मुंबईने क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये १४९ वा क्रमांक मिळवला आहे. तर  मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी या क्रमवारीतील टॉप ५ आहेत. चार चिनी विद्यापीठांनी QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ च्या टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.

 

चीनच्या पेकिंग विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळाला असून हाँगकाँगच्या हाँगकाँग विद्यापीठाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर त्सिंगुआ विद्यापीठ, झेजियांग विद्यापीठ आणि फुदान विद्यापीठ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. दक्षिण कोरियाचे योनसेई विद्यापीठ आणि कोरिया विद्यापीठ आठव्या आणि नवव्या स्थानावर आहे आणि हाँगकाँगचे चीनी विद्यापीठ १० व्या स्थानावर आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO