सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव’ उत्साहात

'इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हल' अंतर्गत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत 'आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव' संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव’ उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक, संस्कृतिक तसेच दैनंदिन व्यवहार, व्यवसाय याचे ज्ञान देत असते. परंतू आरोग्याच्या बाबतीत कुठे मागे राहू नये यासाठी पोषक आहाराची आपल्या आयुष्यात खुप महत्ताची भुमिका असते. हा उद्देश लक्षात घेऊन विद्यापीठात सुरु असणाऱ्या 'इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हल' (International Youth Festival) अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव' (International Food Festival)आयोजन करण्यात आले होते. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून  कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर शिक्षण मंत्रालयतील हमीद खामीस अलबालुशी, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे आदी उपस्थित होते.  

यावेळी कुलगुरू गोसावी म्हणाले , पोषक आहार आपल्या आयुष्यात खुप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र जगात अन्नधान्याचे संकट सुरू असून अनेकांना पुरेसा पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्याकडील अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

डॉ. खरे म्हणाले,  हा खाद्य महोत्सव म्हणजे संस्कृतींचा उत्तम मिलाप आहे. खाद्य पदार्थ्यांच्या माध्यमातून आपण सर्वजन आज एकमेंकांची संस्कृती जाणून घेऊया.

दरम्यान, या खाद्य महोत्सवात २३ देशांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी देशाने आपले पारंपारिक खाद्यपदार्थ या ठिकाणी प्रदर्शित करून आपले पाक कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोळंबी, अस्सल गोड लोणचे असलेले चिकन, इथिओपियन ब्रेड, तळलेले कसावा चिप्स, इंडोनेशियन चिकन सिओमाय, मोफो रामानोका, क्रेप औ नुटेला ओउ डु मील, नेपाळी लोणचे, स्वॅलो आणि  इगुसी सूप, पोलिश पॅनकेक, मटण करीसह भात, नॉर्थस्टर्न थाई इसान, बकलावा, स्प्रिंग रोल इ. विविध देशातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. त्यानंतर विविध देशातील विद्यार्थ्यांनी नृत्य व वादनाची कला सादर केली. हा  ‘इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हल’ १० तारखेपर्यंत चालणार असून १० तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.