बीएड अभ्यासक्रमावर बंदी; आता ४ वर्षांत ड्युअल अंडरग्रेजुएट पदवी मिळणार

२०२४-२५ चे सत्र हे जुन्या चार वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र

बीएड अभ्यासक्रमावर बंदी; आता ४ वर्षांत ड्युअल अंडरग्रेजुएट पदवी मिळणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Educational Policies) शिक्षण क्षेत्रात झपाट्याने मोठे बदल होत आहेत. शिक्षक होण्याचे   स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आता सरकारने अगदी सोपे करुन ठेवले आहे. पदवी शिक्षण झाल्यानंतर बीएड (B Ed) शिक्षणासाठी दोन वर्ष खर्च करावी लागत होती. त्यामुळे आता या बीएड अभ्यासक्रमावर बंदी  (BEd course closed) घालण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (National Council of Teacher Education) घेतला आहे. दोन वर्षांचा विशेष बीएड अभ्यासक्रम बंद केल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) आता जुने चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम (BA B.Ed आणि B.Sc. B.Ed) बंद करण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने जारी केलेल्या नोटीसनुसार, शैक्षणिक सत्र २०२५-२६ पेक्षा जुना चार वर्षांचा एकात्मिक बीएड अभ्यासक्रम बंद केला जाईल. २०२४-२५ चे सत्र हे जुन्या चार वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असेल. यानंतर या जुन्या अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश होणार नाहीत. विविध शिक्षक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन चार वर्षांचा B.Ed एकात्मिक अभ्यासक्रम ITEP सुरु केला जाईल.

NCTE ने म्हटले आहे की ज्या संस्था आधीच चार वर्षांचे एकात्मिक B.Sc. B.Ed आणि BA B.Ed अभ्यासक्रम देत आहेत त्यांची मान्यता कायम राहील. सध्या, २०२५ पर्यंत शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सुधारित नियमांनुसार नवीन एकात्मिक बीएड अभ्यासक्रम ITEP (ITEP B.Ed.) मध्ये रूपांतरित होतील. नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार २०३० नंतर ज्या शिक्षकांनी नवीन आयटीईपी चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम केला आहे अशाच शिक्षकांना शाळांमध्ये सामावून घेतले जाईल. 

आयटीईपी कोर्स म्हणजे काय 

NCTE ने शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून देशभरातील IIT, NIT, केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांसह ५७ शिक्षक शिक्षण संस्थांमध्ये (TEIs) एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) सुरू केला. हा अभ्यासक्रम मार्च २०२३ मध्ये सुरू करण्यात आला. NEP २०२२ अंतर्गत NCTE चा हा प्रमुख कार्यक्रम आहे. ITEP, जी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी अधिसूचित करण्यात आली, ही ४ वर्षांची ड्युअल-कंपोझिट अंडरग्रेजुएट पदवी आहे जी B.A. B.Ed./ B.Sc B.Ed. / आणि B.Com B.Ed. अभ्यासक्रम देते. हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत दिलेल्या नवीन शालेय शिक्षण प्रणालीच्या पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक (५+३+३+४) अशा ४ टप्प्यांसाठी  शिक्षकांना तयार करेल.