भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ

स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च पर्यंत क्षेत्रीय स्तरावर स्विकारण्यात आलेले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ
Swadhar Scheme

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शासकीय वसतिगृहात (Government Hostel) प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scheme) राबविली जाते. योजनेअंतर्गत मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या (Students) आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून दिली जाते. योजनेसाठी २०२२-२३ मधील अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना दिनांक १४ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे.

स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च पर्यंत क्षेत्रीय स्तरावर स्विकारण्यात आलेले आहे. पण क्षेत्रीय कार्यालये, विविध संघटना, पालक, विद्यार्थी यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहु नये, यासाठी सदर योजनेअंतर्गत अर्ज स्विकारण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

SPPU News : पदवी प्रदान समारंभ १ जुलैला; सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या ५ किमी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १० वी/ १२ वी/ पदवी/ पदविका परीक्षेमध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo