PGI-D : सातारा जिल्ह्याने देशात उंचावली मान; शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची घसरण

इंडेक्समध्ये महाराष्ट्राला १ हजार पैकी ५८३.२ गुण मिळाले आहेत. टॉप टेन राज्यांच्या यादी महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. मुल्यमापनासाठी सहा गट निश्चित करण्यात आले होते.

PGI-D : सातारा जिल्ह्याने देशात उंचावली मान; शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची घसरण
Satara District Top in PGI-D

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या शाळांच्या २०२१-२२ च्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI-D) मध्ये जिल्हानिहाय क्रमवारीत महाराष्ट्रात (Maharashtra) सातारा (Satara) जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर देशात सातारा जिल्हा २५ व्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरचा क्रमांक लागतो. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणारे पुणे (Pune) या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे. प्रामुख्याने अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, अध्ययन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा गटात पुणे मागे पडले आहे. (Performance Grading Index)

इंडेक्समध्ये महाराष्ट्राला १ हजार पैकी ५८३.२ गुण मिळाले आहेत. टॉप टेन राज्यांच्या यादी महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. मुल्यमापनासाठी सहा गट निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण सहा गटात १२ मुद्यांच्या आधारे मुल्यमापन करण्यात आले आहे. निष्पत्ती या गटात अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, शाळा व शिक्षकांची उपलब्धता, वर्गातील प्रभावी अध्ययन या गटात अध्ययन व्यवस्थापन, उपक्रम, तिसऱ्या गटात पायाभूत सुविधा, चौथ्या गटात शाळा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पाचव्या गटात डिजिटल अध्ययन आणि प्रशासकीय प्रक्रिया या सहाव्या गटात निधीचा वापर, हजेरी नियंत्रण यंत्रणा आणि शाळा नेतृत्व विकास आदी मुद्दायंचा समावेश होता. एकूण ६०० गुणांमधून जिल्ह्यांमधील शाळांचे मुल्यमापन करण्यात आले आहे.

PGI 2.0 : शालेय शिक्षणात महाराष्ट्राची 'ग्रेड' घसरली, अध्ययन निष्पत्ती अन् गुणवत्तेत मागे

पीजीआय डीमध्ये देशातील ७४८ जिल्ह्यांचा समावेश असून त्यात सातारा जिल्हा २५ व्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्याला ६०० पैकी ४३० गुण मिळाले आहेत. देशात पंजामधील बर्नाला जिल्हा ४६८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात साताऱ्यानंतर मुंबई (४२४) आणि कोल्हापुर व नाशिक (४२२) हे जिल्हे आघाडीवर आहेत. तर पुणे व नगर ४०७ गुणांसह संयुक्तपणे तेराव्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील चार जिल्हे अतिउत्तम या ग्रेडमध्ये तर ३२ जिल्हे उत्तम या ग्रेडमध्ये आहेत. निष्पत्ती या गटात सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सोलापूरला उत्तम ग्रेड मिळाली आहे. तर बुलडाणा, गडचिरोली, मुंबई उपनगर आणि नागपूर हे जिल्हे प्रचेस्टा २ गटात तर उर्वरित जिल्हे प्रचेस्टा १ गटात आहेत. पुणे जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर आहे. इफेक्टिव्ह क्लासरुम ट्रान्झेक्शन गटात सर्वच जिल्ह्यांची कामगिरी चांगली असून परभणी वगळता सर्व दक्ष या ग्रेडमध्ये आहेत. यामध्येही पुणे मागे पडले असून ३० व्या स्थानावर फेकले गेले आहे.

विज्ञान, गणिताला शिक्षक आणायचे कुठून? ३ वर्षात केवळ तेराशे शिक्षक टीईटी उत्तीर्ण

सुविधांच्या बाबतीत चंद्रपूर आणि गोंदियाने बाजी मारली असून इतर जिल्ह्यांची कामगिरीही चांगली राहिली आहे. पुणे जिल्हा या गटात २० व्या स्थानावर आहे. सुरक्षेच्या बाबतीत सर्वच जिल्हे दक्ष गटात आहेत. डिजिटल लर्निंगमध्ये सर्वच जिल्हे अजूनही मागे असल्याचे दिसते. मुंबई, जळगाव व ठाणे हे जिल्हे प्रचेस्टा १ ग्रेडमध्ये तर पुण्यासह सातारा प्रचेस्टा २ ग्रेडमध्ये आहेत. प्रशासन गटात मुंबई उपनगर दक्ष ग्रेडमध्ये, सातारा उत्कर्ष आणि पुण्यासह १४ जिल्हे अति उत्तम ग्रेडमध्ये आहेत. तर उर्वरित जिल्ह्यांना उत्तम ग्रेड मिळाली आहे.

 

महाराष्ट्रातील टॉप टेन जिल्हे (कंसात ६०० पैकी प्राप्त गुण) –

  • सातारा (४३०)
  • मुंबई (४२४)
  • कोल्हापूर (४२२)
  • नाशिक (४२२)
  • सोलापूर (४१९)
  • मुंबई उपनगर (४१५)
  • औरंगाबाद (४११)
  • रत्नागिरी (४१०)
  • सांगली (४०९)
  • जळगाव, सिंधुदुर्ग व बीड (४०८)
  • पुणे व अहमदनगर (४०७)

 

असे होते ग्रेडिंग

दक्ष (९० टक्क्यांपेक्षा जास्त)

उत्कर्ष (८१ ते ९० टक्के)

अति उत्तम (७१ ते ८० टक्के)

उत्तम (६१ ते ७० टक्के)

प्रचेस्टा-१ (५१ ते ६० टक्के)

प्रचेस्टा-२ (४१ ते ५० टक्के)

प्रचेस्टा-३ (३१ ते ४० टक्के)

आकांशी-१ (२१ ते ३० टक्के)

आकांशी-२ (११ ते २० टक्के)

आकांशी-३ (१० टक्क्यांपर्यंत)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD